टीईटी परीक्षा घोटाळ्यातील खर्‍या गुन्हेगाराचा शोध घ्यायचा असेल तर हे प्रकरण सीबीआयला सोपवा, फडणवीसांची मागणी

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी (TET Exam Scam) सीबीआय चौकशीची मागणी(Devendra Fadnavis Demand CBI Inquiry Of TET Scam) केली आहे.

    मुंबई : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी (TET Exam Scam) तुकाराम सुपेंकडे (Tukaram Supe) ८८ लाख रुपये आणि आज पुन्हा २ कोटी रुपये रोख आणि सोने सापडल्यानंतर या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी (Devendra Fadnavis Demand CBI Inquiry Of TET Scam) केली आहे.

    ते म्हणाले की, म्हाडाच्या परीक्षेत गैरप्रकार करणार्‍या जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीला अभय याच तुकाराम सुपेंनी दिले. काळ्या यादीतील या कंपनीला त्यांनीच ३ महिन्यात बाहेर काढले. आता या जीए सॉफ्टवेअरचे संचालक डॉ. प्रीतिश देशमुखकडे पोलीस भरतीची ओळखपत्र सापडली आहेत. त्यामुळे आरोग्य भरती, म्हाडा, टीईटी, पोलीस भरती हे सर्व घोटाळे एकाच माळेचे मणी दिसताहेत. या सर्व घोटाळ्यातील गुंतागुंत पाहता सीबीआय चौकशी व्हायलाच हवी, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

    ते म्हणाले की, सीबीआय चौकशी झाली तरच या घोटाळ्यांमधील मंत्रालयातील धागेदोरे उघड होतील, अन्यथा वसुलीचे हे आणखी एक प्रकरण कधी उजेडात येणारच नाही. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, लाखो विद्यार्थ्यांना वेठीस धरणार्‍या खर्‍या गुन्हेगारांचा शोध घ्यायचा असेल तर हे प्रकरण सीबीआयला सोपवा.