अनिल देशमुख १५ फेब्रुवारी रोजी काय करत होते?; देवेंद्र फडणवीसांनी केला मोठा गौप्यस्फोट

शरद पवार यांनी काल गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लीन चिट दिली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून पवारांच्या दाव्यांची पोलखोल केली होती. त्यामुळे फडणवीस आज काय मोठा गौप्यस्फोट करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आपण नेहमी मराठीत आणि हिंदीत बोलतो. पण पवारांनी हा विषय राष्ट्रीय केला आहे. त्यामुळे मी हिंदीत सुरुवातीला बोलेल त्यानंतर मराठीत बोलेन. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    मुंबई: राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख १५ फेब्रुवारीला होम क्वॉरंटाईन नव्हते. ते एका खासगी विमानाने मुंबईत आले होते. त्या दिवशी ते अनेकांना भेटले होते, असा दावा करतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना चुकीची माहिती देण्यात आली असून आता देशमुख एक्सपोज झाले आहेत, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

    शरद पवार यांनी काल गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लीन चिट दिली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून पवारांच्या दाव्यांची पोलखोल केली होती. त्यामुळे फडणवीस आज काय मोठा गौप्यस्फोट करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आपण नेहमी मराठीत आणि हिंदीत बोलतो. पण पवारांनी हा विषय राष्ट्रीय केला आहे. त्यामुळे मी हिंदीत सुरुवातीला बोलेल त्यानंतर मराठीत बोलेन. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    पोलीस विभागाच्या दैनंदिन कामाचा माझ्याकडे एक कागद आहे. त्यात १७ फेब्रुवारीची एक तारीख आहे. त्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतला राहतील. तर अनिल देशमुख हे दुपारी ३ वाजता सह्याद्रीला येतील. त्यानंतर २४ तारखेला पुन्हा अनिल देशमुख हे ११ वाजता मोटारीने निवासस्थानी जाणार असल्याचं पोलिसांची माहिती आहे. अर्थात त्या कार्यक्रमानुसार ते गेले असतीलच असा माझा दावा नाही, असं फडणवीस म्हणाले.