मनोहर पर्रिकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने देवेद्र फडणवीसांनी अर्पन केली श्रद्धांजली

अत्यंत साधे राहणीमान आणि तल्लख बुद्धी असलेले पर्रीकरांनी अखेरच्या श्वासापर्यंत काम करीत राहिले. अखेरच्या काही दिवसांमध्ये त्यांच्या निवासस्थानीच त्यांच्यावर उपचार सुरु होते. २०१८ पासून पर्रिकर हे स्वादुपिंडाच्या कर्करोगाने ग्रस्त होते. त्यांच्या निधनानंतर सामान्यांमधील असामान्य नेतृत्व गमावल्याची भावना भारतीयांनी व्यक्त केली होती. अनेक नेत्यांनी, कलाकारांनी, खेळाडूंनी पर्रिकरांना श्रद्धांजली अर्पण केली.

    मुंबई – गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांची आज पुण्यतिथी. २०१९ साली आजच्याच दिवशी वयाच्या ६३ वर्षी त्यांचे निधन झालं. अत्यंत साधे राहणीमान आणि तल्लख बुद्धी असलेले पर्रीकरांनी अखेरच्या श्वासापर्यंत काम करीत राहिले. अखेरच्या काही दिवसांमध्ये त्यांच्या निवासस्थानीच त्यांच्यावर उपचार सुरु होते. २०१८ पासून पर्रिकर हे स्वादुपिंडाच्या कर्करोगाने ग्रस्त होते. त्यांच्या निधनानंतर सामान्यांमधील असामान्य नेतृत्व गमावल्याची भावना भारतीयांनी व्यक्त केली होती. अनेक नेत्यांनी, कलाकारांनी, खेळाडूंनी पर्रिकरांना श्रद्धांजली अर्पण केली.


    पर्रिकर हे त्यांच्या राजकीय प्रवासाबरोबरच साधेपणासाठीही ओळखले जायचे. मुख्यमंत्री आणि नंतर संरक्षणमंत्री झाल्यानंतरही त्यांचे साधे रहाणीमान कायमच राहिले. मुख्यमंत्री झाल्यानंतरही ते अनेक वर्ष वडीलोपार्जित घरातच राहत होते. अनेकदा गोवेकरांनी पर्रिकरांना स्कुटवरुन ऑफिसला जाताना पाहिले आहे. त्यांच्या अशाच साधेपणाचे अनेक किस्से गोवेकरांच्या चर्चेमध्ये सहज ऐकायला मिळतात.