Devendra Fadnavis to break record; Arya Rajendran, 21, will be the youngest mayor in the country

तिरुवनंतपुरम महापालिकेत मुडवणमुगल प्रभागातूनतून आर्या राजेंद्रन विजयी झाल्या आहेत. आर्या राजेंद्रन यांनी महापौर पदाची शपथ घेतल्यानंतर ती महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा विक्रम मोडणार आहे. आर्या राजेंद्रन भारतातील सर्वात तरुण महापौर होणार आहेत. त्या सध्या ऑल सेंटस कॉलेजमध्ये बीएस्सी मॅथ्सचे शिक्षण घेत आहेत.

मुंबई : महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस १९९५ मध्ये वयाच्या २७व्या वर्षी नागपूरचे महापौर झाले होते.  त्यावेळेपासून देशातील सर्वात तरुण महापौर होण्याचा विक्रम फडणवीसांच्या नावावर आहे. त्यांचा हा विक्रम मोडून आता आर्या राजेंद्रन ही केवळ २१वर्षीय तरुणी तिरुवनंतपुरमची नगरसेवक म्हणून विजयी झाली असून ती लवकरच महापौर पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

तिरुवनंतपुरम महापालिकेत मुडवणमुगल प्रभागातूनतून आर्या राजेंद्रन विजयी झाल्या आहेत. आर्या राजेंद्रन यांनी महापौर पदाची शपथ घेतल्यानंतर ती महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा विक्रम मोडणार आहे. आर्या राजेंद्रन भारतातील सर्वात तरुण महापौर होणार आहेत. त्या सध्या ऑल सेंटस कॉलेजमध्ये बीएस्सी मॅथ्सचे शिक्षण घेत आहेत.

आर्या राजेंद्रन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून निवडणुकीत विजयी झाल्या असून स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाची राज्य कार्यकारिणीच्या सदस्य देखील आहेत. देवेंद्र फडणवीस वयाच्या २७ व्या वर्षी नागपूर महापालिकेचे महापौर झाले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस नागपूरच्या राम नगर वार्डमधून विजयी झाले होते.

आर्या राजेंद्रन सीपीएमच्या ब्रँच कमिटी सदस्य असून बालाजनसंघम प्रदेशाच्या अध्यक्ष आहेत. आर्याचे वडील इलेक्ट्रिशीयनचे काम करतात. तर, तिची आई श्रीलथा एलआयसी एजंट म्हणून काम करते. केरळमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये डाव्या पक्षांच्या लेफ्ट डेमोक्रॅटीक फ्रंटने विजय मिळवला आहे. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत एलडीएफ प्रथम क्रमांकावर, काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर राहिली.

केरळमधील स्थानिक निवडणुकांमध्ये ९४१ ग्रामपंचायत आणि १४ जिल्हा परिषदांमध्ये सत्तारुढ डाव्या आघाडीला विजय मिळाला आहे. १० जिल्हा परिष, १५२ पंचायत समित्यांमध्ये सीपीएमच्या नेतृत्वातील एलडीएपला विजय मिळवला आहे. तर भाजपने २३ ग्रामपंचायतीमध्ये विजय मिळवला आहे.