Even Fadnavis had used threatening language when he was the Chief Minister Criticism of Sanjay Raut

मुंबई : राममंदीर हा संस्कृतीच्या सन्मानाचा मुद्दा केवळ राजकीय दृष्टीने त्याकडे पाहता येत नाही. अश्या शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या राम मंदीराच्या राजकारणाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रभु रामचंद्र समाजाचे होते त्यामुळे समाजाला त्यांच्या प्रती आजही आस्था आहे, या देशाला आसेतू हिमाचल एकात्म करणारी शक्ती राम आहे त्यामुळे त्यांच्या मंदीराच्या कार्यात समाजाच्या सर्व घटकांचे योगदान असायलाच हवे. ज्यांना वर्गणी का गोळा करता असा प्रश्न पडला आहे त्यांनी देखील या मध्ये योगदान द्यायला हवे कारण प्रभू राम सर्वाचे आहेत. अश्या शब्दात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

भाजप उपाध्यक्ष माधव भांडारी यांच्या परम मित्र प्रकाशन व्दारे प्रकाशीत होणा-या आयोध्या या पुस्तकाचे प्रकाशन फडणवीस यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेता प्रविण दरेकर, भाजप आमदार आशिष शेलार यांच्यासह पुस्तकाचे प्रकाशक माधव जोशी, रमेश पतंगे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना भांडारी यांनी मनोगतात सांगितले की, टाळेबंदीच्या काळात प्रकाशक आणि पत्रकार अरून करमरकर यांनी गळ घातल्याने आयोध्येच्या इतिहासावर अभ्यास करण्याचे भाग्य मिळाले. एक कारसेवक म्हणून परिचीत असलेल्या या विषयावर ऐतिहासिक संदर्भासह ग्रंथ त्यातून साकारण्यात आला आहे. ज्या मध्ये या विषयाचा सुरूवातीपासूनचा इतिहास आणि घटनाक्रम तसेच अंतिम टप्प्यात सर्वोच्च न्यायालयातील साक्षी पुराव्यासह देण्यात आला  आहे.

या पुस्तकांच्या निमित्ताने शुभेच्छा देताना विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले की, नव्या पिढीला या आंदोलनाची माहिती मुळापासून समजून घेण्यासाठी या पुस्तकांचा नक्कीच उपयोग होणार आहे. भाजप आमदार आशिष शेलार म्हणाले की, आयोध्याचा लढा हा अनेक शतकांच्या लढ्याचा इतिहास आहे त्यात अलिकडच्या काळात काही लोकांनी राजकीय घुसखोरी करण्याचा  प्रयत्न केला आहे त्यांना या पुस्तकामुळे आयोध्येचा खरा इतिहास नव्याने समजण्यास सोपा होणारआहे. पूर्वजांच्या काळापासून आम्ही दिलेल्या लढ्याला नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भुमीपूजन झाले त्यानंतर पूर्णत्व प्राप्त झाले आहे त्या लढ्याचा इतिहास या पुस्तकांत आहे असे ते म्हणाले. मंगलप्रभात लोढा यांनी लेख क भांडारी यांचा गौरव करताना एका कारसेवकाने या लढ्याचा पुराव्यासह  इतिहास मांडला हे कौतुकास्पद असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाच्या समारोपाला बोलताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाबराच्या काळापासून हिंदुत्वा वर घाला घालून गुलामीच्या मानसिकतेमध्ये समाजाला ढकलणा-याविरुध्दचा लढा म्हणजे आयोध्याचे या पुस्तकात सांगण्यात आलेला  इतिहास आहे असे सांगितले. ते म्हणाले की, २ २ डिसें १९४९ रोजी या मंदीरात मुर्ती प्रकट झाल्यानंतर नव्याने या मंदीराचा संघर्ष तिव्र झाला त्यामुळे आज योगायोगाने प्रकाशन करण्यासाठी हा दिवस मिळाला हा देखील वेगळा संयोग आहे. राम मंदीराला निधी देण्याची ज्यांची इच्छा असेल त्या सर्वांसाठी भगवान रामाचे मंदीर हा संस्कृतीच्या सन्मानाचा मुद्दा असल्याने केवळ राजकीय दृष्टीने त्याकडे पाहता येत नाही.