Excitement over finding terrorists in Dharavi! Were the state's ATS asleep? Three questions to BJP's Thackeray government

ऐन उत्सवकाळात देशात घातपात घडविण्याचा कट रचणाऱ्या सहा दहशतवाद्यांना दिल्लीच्या विशेष पथकाने अटक केल्यांनतर शुक्रवारी रात्री महाराष्ट्र एटीएसने आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त पथकासह कारवाई करत मुंबईतील जोगेश्वरी परिसरातून संशयित दहशतवादी झाकीर हुसेन शेखला अटक केली. झाहीर हा दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिमच्या संपर्कात होता. झाकीर शेख हा जान मोहम्मदचा हॅन्डलर असून त्यानेच जान मोहम्मदला हत्यारे आणि विस्फोटकांची डिलिव्हरी करण्यास सांगितल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

    मुंबई : दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या दहशतवाद्यांचे मुंबईतील कनेक्शन असलेल्या एका संशयित दहशतवाद्याला महाराष्ट्र एटीएसने ताब्यात घेतले. त्याला शनिवारी मुंबई न्यायालयाने २० सप्टेंबरपर्यंत एसटीएस कोठडी सुनावली आहे.

    ऐन उत्सवकाळात देशात घातपात घडविण्याचा कट रचणाऱ्या सहा दहशतवाद्यांना दिल्लीच्या विशेष पथकाने अटक केल्यांनतर शुक्रवारी रात्री महाराष्ट्र एटीएसने आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त पथकासह कारवाई करत मुंबईतील जोगेश्वरी परिसरातून संशयित दहशतवादी झाकीर हुसेन शेखला अटक केली. झाहीर हा दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिमच्या संपर्कात होता. झाकीर शेख हा जान मोहम्मदचा हॅन्डलर असून त्यानेच जान मोहम्मदला हत्यारे आणि विस्फोटकांची डिलिव्हरी करण्यास सांगितल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

    जान मोहम्मदला दिल्ली पोलिसांनी अटक केल्यानंतर मुंबई एटीएस झाकीर हुसेन शेखच्या मागावर होते. त्यांच्यापासून सुटका करण्यासाठी झाकीर शेख हा मुंब्रामध्ये सुरक्षित जागा शोधत होता. त्याने त्याच्या पत्नीला वांद्रे येथील एका नातेवाईकाकडे ठेवले होते. याची माहिती मिळताच एटीएसने सापळा रचून झाकीरला जोगेश्वरी परिसरात भेटायला बोलावत त्याला ताब्यात घेतले. शनिवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.

    महाराष्ट्रासह इतरत्र स्फोटकांचा वापर करून दहशतवादी हल्ले करण्याचा कट रचल्याप्रकरणी झाकीरला अटक करण्यात आली आहे. झाकीर दहशतवाद्यांच्या संपर्कात होता. ती व्यक्ति कोण? तसेच या कटात झाकीरची भूमिका काय? याबाबत एटीएसला तपास करायचा असून त्यासाठी झाकीरचा ताबा देण्यात यावा, अशी मागणी एटीएसने शनिवारी न्यायालयाकडे केली. त्याची दखल घेत न्यायालयाने झाकीरला २० सप्टेंबरपर्यंत एसटीएस कोठडी सुनावली.