धारावीसह दादर-माहीममधील कोरोना रुग्णवाढ नियंत्रणात – धारावीत आज ११ रुग्णांची नोंद

मुंबई:धारावीतील रुग्णसंख्या मागील काही दिवसांपासून नियंत्रणात येत असून आज केवळ ११ नवीन रुग्णांची नोंद झाली. धारावीतील रुग्णसंख्या आज १९६४ वर पोहोचली आहे.धारावीसह दादर-माहीम

 मुंबई: धारावीतील रुग्णसंख्या मागील काही दिवसांपासून नियंत्रणात येत असून आज केवळ ११ नवीन रुग्णांची नोंद झाली. धारावीतील रुग्णसंख्या आज १९६४ वर पोहोचली आहे. धारावीसह दादर-माहीम परिस्थिती ही नियंत्रणात येत असल्याचे दिसत असून रुग्णसंख्या घटली असल्याचे  दिसून येत आहे.  

आज  धारावीत १११ नवीन रुग्ण सापडल्याने रुग्णांची संख्या १९६४ वर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा ७३ वर पोहोचला आहे. माहीममध्ये आज २५ नवीन रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची संख्या ७०१ इतकी झाली आहे. तर मृतांचा आकडा १३ इतका आहे. तर दादरमध्ये आज १५ नवीन रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांची संख्या ही ४४६ इतकी झाली आहे. तर आजपर्यंत १५ मृत्यू झाले आहेत. धारावीसह दादर आणि माहीम मधील परिस्थिती देखील नियंत्रणात आल्याचे दिसून येत आहे. जी उत्तर विभागात आज दिवसभरात ५१ नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांची संख्या ३१११ इतकी झाली आहे. तर मृतांचा आकडा १०० इतका आहे.