DHFL case: Hearing on petition of Rana Kapoor's wife and daughters completed; Decision reserved by the High Court

येस बँकेच्या ३७०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआय आणि ईडीकडून तपास केला जात आहे. आर्थिक अनियमितता आणि वारेमाप कर्ज वाटप यामुळे रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) येस बँकेवर ५ मार्चपासून निर्बंध लागू केले होते. त्यानंतर टप्याटप्याने ते शिथिल केले आणि येस बँकेचे व्यवहार पूर्ववत केले होते. मात्र बड्या उद्योगांना दिलेले कर्जे बुडीत खात्यात गेल्याने बँकेची आर्थिक स्थिती कमकुवत झाली आहे.

    मुंबई : डीएचएफएलशी संबंधित कथित भ्रष्टाचार प्रकरणात येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांची पत्नी बिंदू कपूर आणि मुली राधा आणि रोशनी कपूर यांच्या जामीन अर्जावरील निर्णय गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे.

    येस बँकेच्या ३७०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआय आणि ईडीकडून तपास केला जात आहे. आर्थिक अनियमितता आणि वारेमाप कर्ज वाटप यामुळे रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) येस बँकेवर ५ मार्चपासून निर्बंध लागू केले होते. त्यानंतर टप्याटप्याने ते शिथिल केले आणि येस बँकेचे व्यवहार पूर्ववत केले होते. मात्र बड्या उद्योगांना दिलेले कर्जे बुडीत खात्यात गेल्याने बँकेची आर्थिक स्थिती कमकुवत झाली आहे.

    हा घोटाळा उघड झाल्यानंतर येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची पत्नी बिंदू आणि मुली रोशनी आणि राधा कपूर खन्ना यांनाही अटक करण्यात आली. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने १८ सप्टेंबर रोजी त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावत त्यांची १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्या निर्णयाला तिघिंनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

    त्यावर गुरुवारी न्या. भारती डांगरे यांच्यासमोर सुनावणी पार पडली. जेव्हा, आरोपी फरार होण्याची शक्यता निर्माण होते तेव्हाच त्यांना अटक करून कोठडीत पाठविण्यात येते मात्र, याप्रकरणी याचिकाकर्त्यांनी सीबीआयला तपासात संपूर्ण सहकार्य केले असल्याचा दावा कपूर यांच्यावतीने करण्यात आला. त्यास सीबीआयकडून अँड. हितेश वेनेगावकर यांनी विरोध केला. दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला असून २८ सप्टेंबर रोजी तो जाहीर करण्याची शक्यता आहे.