
एफआरपीला विरोध करण्यासाठी आम्ही शेतकरी समूहामार्फत डिजिटल आंदोलन छेडत असल्याचं चोरमुले यांनी सांगितलं आहे. शनिवारी 25 सप्टेंबर 2021 रोजी संध्याकाळी 5 ते 9 या वेळेला ‘#एकरकमी_frp’ हा हॅशटॅग करून आपल्याला फेसबुक, ट्विटर, इंस्टाला पोस्ट करायचं आव्हान देखील त्यांनी यावेळी केली आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ऊसाची एफआरपी टप्प्यात दिली पाहिजे यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार देखील प्रयत्नशील आहे. त्यामुळे राज्य सरकारने देखील ऊसाची एफआरपी 3 टप्प्यात (60+20+20) देण्यात यावी, अशी केंद्राकडे शिफारस केली असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान नीती आयोगाने केंद्र सरकारकडे शिफारस केली होती. व नंतर, केंद्र सरकारने राज्य सरकारचे म्हणणे जाणून घेण्यासाठी विचारणा केली होती , पण, राज्य सरकारने या निर्णयाला विरोध केला नाही. कारण या सरकार मधील अजित पवार, जयंत पाटील, अमित देशमुख इत्यादी महत्वाचे मंत्री हे साखर कारखानदार आहेत.
त्यातच आता एकरकमी एफआरपीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून डिजिटल आंदोलन करण्यात येणार आहे. केंद्रात जर भाजपचे सरकार आहे तर महाराष्ट्र सरकारने या निर्णयाचा विरोध केला पाहिजे आणि एकरकमी द्यावी असा आग्रह केला पाहिजे. त्यामुळे महाविकास आघाडीची लोकप्रियता वाढेल. कदाचित हा निर्णय मविआच्या आमदारांना मान्य नसेल, असं ऊस तज्ज्ञ डॉ अंकुश जालिंदर चोरमुले यांनी म्हटलं आहे.
एफआरपीला विरोध करण्यासाठी आम्ही शेतकरी समूहामार्फत डिजिटल आंदोलन छेडत असल्याचं चोरमुले यांनी सांगितलं आहे. शनिवारी 25 सप्टेंबर 2021 रोजी संध्याकाळी 5 ते 9 या वेळेला ‘#एकरकमी_frp’ हा हॅशटॅग करून आपल्याला फेसबुक, ट्विटर, इंस्टाला पोस्ट करायचं आव्हान देखील त्यांनी यावेळी केली आहे. प्रत्येकाने या डिजिटल मोहिमेत सहभागी व्हावं व आपली एकी दाखवावी, असं आवाहन देखील शेतकरी समूहामार्फत करण्यात येत आहे. तसेचं राजू शेट्टी यांनीही राज्यातील शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.
राजू शेट्टी नेमकं काय म्हणाले?
“होय आम्ही शेतकरी “ समूहाकडून एकरक्कमी एफ आर पी मिळविण्यासाठी व ऊस उत्पादक शेतकर्यांचा स्वाभिमान जपण्यासाठी आज शनिवार दिनांक २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते ९ यावेळेत सर्व सोशल मिडीयावर ( व्हॅाटसअप , फेसबुक , इन्स्टांग्राम , ट्वीटर ) #एकरक्कमी_FRP हा हॅशटॅग चालवायचा आहे. तरी सर्व शेतकरी बंधूंना माझी विनंती आज हा हॅशटॅग चालवून महाराष्ट्रातील शेतकर्यांची एकजूट दाखवा.
#होयआम्हीशेतकरी असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे.
ऊस उत्पादक शेतकर्यांचा स्वाभिमान जपण्यासाठी आज शनिवार दिनांक २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते ९ यावेळेत सर्व सोशल मिडीयावर *#एकरक्कमी_FRP* हा हॅशटॅग चालवून सर्व शेतकरी बंधूंनी महाराष्ट्रातील शेतकर्यांची एकजूट दाखवावी.#शेतकरी#अन्नदाता #स्वाभिमानीबळीराजा pic.twitter.com/u56IsTXuZu
— स्वाभिमानी शेतकरी संघटना अधिकृत (@swabhimani7227) September 25, 2021
दरम्यान, जर पहिला हफ्ता 60 % मिळाला तर 1600 ते 1700 च्या आसपास पहिला हफ्ता मिळेल जो सोसायटी आणि कर्ज भागवण्यात जाईल. पश्चिम महाराष्ट्रातील ही परिस्थिती आहे तर मराठवाडा आणि विदर्भात तर परिस्थिती वाईट आहे. आज सगळ्या पिकांचा विचार केला तर ऊस हा आपण उधारीवर कारखान्याला देतोय. कधी पैसे मिळतील, किती मिळतील याची खात्री नाही. बाकीच्या पिकात काहीतरी भाव मिळतो पण ऊस हा उधारच द्यावा लागतोय. या बाबतीत आताच जागे व्हा नाहीतर आयुष्यभर गुलाम होण्याची तयारी ठेवा, असंही डॉ अंकुश जालिंदर चोरमुले यांनी म्हटलं आहे.