गृहमंत्र्यांविरुद्ध FIR का दाखल केला नाही?, परमबीर सिंग यांना हायकोर्टाचा थेट सवाल

तुम्ही पोलिस आयुक्त होता आणि गृहमंत्र्यांनी १०० कोटी मागितले, तेव्हा याप्रकरणी FIR का केला नाही ?, असा थेट सवाल उच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांना विचारला आहे. तसेच, तुम्ही ज्या कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने आरोप केले आहेत, त्यांचे प्रतिज्ञापत्र तरी जोडले आहे का?. उद्या मलाही मुख्य न्यायमूर्ती म्हणून कोणीही काही सांगेल, मग त्यावर विसंबून चौकशीचे आदेश दिले जाऊ शकतात का? कारवाई केली जाऊ शकते का?", असेही प्रतिप्रश्न न्यायालयाने परमबीरसिंग यांना विचारले आहेत.

    मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या खंडणीचा आरोप केला आहे. याप्रकरणी, सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यांतर त्यांनी उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. या याचिकेवर आजपासून सुनावणीला सुरुवात झाली आहे. परमबीर सिंग यांनी २० मार्च रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून देशमुख यांच्यावर काही आरोप केले होते. देशमुख यांनी बार आणि रेस्टॉरंटकडून दर महिन्याला १०० कोटी रुपये जमा करण्यास सचिन वाझे यांना सांगितल्याचा दावा केला होता. याप्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

    तुम्ही पोलिस आयुक्त होता आणि गृहमंत्र्यांनी १०० कोटी मागितले, तेव्हा याप्रकरणी FIR का केला नाही ?, असा थेट सवाल उच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांना विचारला आहे. तसेच, तुम्ही ज्या कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने आरोप केले आहेत, त्यांचे प्रतिज्ञापत्र तरी जोडले आहे का?. उद्या मलाही मुख्य न्यायमूर्ती म्हणून कोणीही काही सांगेल, मग त्यावर विसंबून चौकशीचे आदेश दिले जाऊ शकतात का? कारवाई केली जाऊ शकते का?”, असेही प्रतिप्रश्न न्यायालयाने परमबीरसिंग यांना विचारले आहेत.

    परमबीर यांची जनहित याचिका ही वैयक्तिक सूडबुद्धीने आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रातही उल्लेख केला होता की, गृहमंत्र्यांसोबत माझे संबंध बिघडले आहेत. खासदार मोहन डेलकर प्रकरणात त्यांनी माझा सल्ला ऐकला नाही. असा उल्लेख या पत्रात असल्याची आठवण महाधिवक्ता कुंभकोणी यांनी कोर्टात सरकारच्यावतीने बाजू मांडतान करुन दिली. दरम्यान, आजपासून या सुनावणीला सुरुवात झाली आहे.