पक्ष सरनाईक यांच्या पाठीशी विनाकारण त्रास दिला जात असेल तर काय मार्ग काढायचा यावर चर्चा : खा संजय राऊत यांचा खुलासा

संपूर्ण पक्ष प्रताप सरनाईक यांच्या पाठीशी आहे. त्यांना चुकीच्या पद्धतीने त्रास दिला जातो अशी त्यांची तक्रार आहे. त्याबाबत आमची चर्चा झाली आहे. सुरू आहे. एकनाथ शिंदे, अनिल परब इतर नेते बसून चर्चा करत असतो.

  मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत मुख्यमंत्र्याना  मागील तीन दिवसांत दुसऱ्यांदा भेटले आणि  त्यानंतर ते तातडीने सिल्वर ओक येथे शरद पवार यांना जावून भेटले. त्यामुळे या मागे काही राजकीय घडामोडी होत असल्याच्या चर्चाना उधाण आले. मागील काही दिवसांपासून शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून भाजपशी जुळवून घेण्याची विनंती केल्यापासून त्याला मुख्यमंत्र्याच्या दिल्ली भेटीशी जोडून पाहिले जावू लागले आहे.

  काय मार्ग काढायचा यावर चर्चा
  त्यामुळे आघाडीत संभ्रमाची स्थिती असल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे सरनाईक यांनी शिवसेना भाजपशी जुळवून घेत नसेल तर आपण राजीनामा देवू अशी भुमिका घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर खा राऊत यांनी सरनाईकांची भेट घेतली होती. त्यानंतर ते मुख्यमंत्र्यानाही भेटले होते. संपूर्ण पक्ष प्रताप सरनाईक यांच्या पाठीशी आहे. त्यांना चुकीच्या पद्धतीने त्रास दिला जातो अशी त्यांची तक्रार आहे. त्याबाबत आमची चर्चा झाली आहे. सुरू आहे. एकनाथ शिंदे, अनिल परब इतर नेते बसून चर्चा करत असतो. आपला आमदार अडचणीत असेल, त्याला विनाकारण त्रास दिला जात असेल तर त्यावर काय मार्ग काढायचा यावर चर्चा होणारच, असे राऊत म्हणाले.

  ‘सामना’चा संपादक म्हणून मुख्यमंत्र्यांना भेटलो
  पुन्हा एकदा तोच घटनाक्रम आज पहायला मिळाला त्याचा खुलासा करताना खा राऊत यांनी मात्र ‘सामना’चा संपादक म्हणून त्या संदर्भात चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांना भेटलो. बाहेर उगाचच संभ्रम कोण पसरवते ते माहीत आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्याने कामाच्या व्यापामुळे रोज भेटणे शक्य होत नाही. त्यामुळे अशा भेटींचे आश्चर्य वाटून घेण्यासारखे काही नाही असे सांगत खुलासा करण्याचा प्रयत्न केला.

  संपूर्ण पक्ष प्रताप सरनाईक यांच्या पाठीशी
  यावेळी प्रताप सरनाईक यांनी मनस्थिती शिवसेनेत राहण्याची आहे का, असा थेट प्रश्न राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर, ‘प्रताप सरनाईक हे शिवसैनिक आहेत आणि शिवसैनिकच राहतील, असे राऊत म्हणाले. ‘मुख्यमंत्र्यांचा आमदारांशी सतत संवाद सुरू आहे. आमच्याशी संवाद सुरू आहे. माझी सरनाईक यांच्याशी चर्चा झाली आहे,’ असेही राऊत म्हणाले.