Would have stopped if there had been participation? Pradip Sharma's claim in court

माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा आणि इतर आरोपींचे डीएनए नमुने रविवारी जमा करण्यात आले. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे असलेले पुरावे आणि आरोपींचे डीएनए टेस्ट तपासून पाहिले जाणार आहेत. डीएनए टेस्टसाठी एक टीम एनआयए कार्यालयात दाखल झाली होती. अँटेलिया स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी शर्माला गुरुवारी ताब्यात घेतले आहे. आता शर्मांच्या निकटवर्तीय पोलिस अधिकाऱ्याच्याही मागावर एनआयए असल्याचे समजते.

  मुंबई : माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा आणि इतर आरोपींचे डीएनए नमुने रविवारी जमा करण्यात आले. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे असलेले पुरावे आणि आरोपींचे डीएनए टेस्ट तपासून पाहिले जाणार आहेत. डीएनए टेस्टसाठी एक टीम एनआयए कार्यालयात दाखल झाली होती. अँटेलिया स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी शर्माला गुरुवारी ताब्यात घेतले आहे. आता शर्मांच्या निकटवर्तीय पोलिस अधिकाऱ्याच्याही मागावर एनआयए असल्याचे समजते.

  आतापर्यंत ९ जण अटकेत

  निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे आणि शर्मा यांच्या आदेशानेच आपण मनसुख हिरेनची हत्या केली, असा दावा अटकेत असलेल्या सतीश आणि मनिष सोनी या आरोपींनी केल्याचे एनआयएच्या वकिलांनी कोर्टात सांगितले होते. त्यानंतर आणखी दोघा जणांना एनआयएने ताब्यात घेतल्याचे समोर आले आहे. शर्मा हे मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचे मास्टरमाईंड असल्याचा दावा केला जात आहे. याप्रकरणात आतापर्यंत एनआयएने वाझे, विनायक शिंदे, रियाझ काझी, सुनील माने, नरेश गोर, संतोष शेलार, आनंद जाधव, शर्मा यांना आतापर्यंत अटक केली आहे.

  सहभाग स्पष्ट

  मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास करताना वाझेसोबत सतीश, मनिष आणि शर्माचा सहभाग स्पष्ट झाला. सतीश आणि मनिष यांनी हिरेनची हत्या केल्याची कबुली दिली. हत्येनंतर दोघांनी शर्मा आणि वाझेसोबत संपर्क साधला होता. या हत्येसाठी दोघा आरोपींना रोख रक्कम देण्यात आली होती, असा दावा एनआयएच्या वकिलांनी कोर्टात केला.

  हे सुद्धा वाचा