‘वातावरण शांत असताना आता काड्या करु नका’ राऊतांचं फडणवीसांना आवाहन

राऊत म्हणाले की, "एकेकाळी विरोधी पक्षनेतेही राज्याचे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्रात अमरावतीसारख्या घटना घडू नयेत, यासाठी विरोधी पक्षनेत्यांनी आगीत तेल न टाकता, ते शांत करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. अशा घटनांचं राजकारण, पेटवापेटवी ही महाराष्ट्राला परवडणारी नाही. महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे. आपण पाहिलं असेल त्याच अमरावतीच्या बाजूला पुढे विदर्भात, गडचिरोलीत, याच पोलिसांनी, याच सरकारनं 26 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. कायद्यापुढं सगळे समान आहेत.

    अमरावती हिंसाचारावरून Amravati Violence शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांच्यावर सडकून टीका केली आहे. राऊत यांनी ‘फडणवीसांनी वादग्रस्त वक्तव्य करून काड्या करू नये, असं मत व्यक्त केलंय. हे ठाकरे सरकार आहे. महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे. येथे कारवाई करताना गट, तट, पक्ष पाहिला जात नाही, असंही यावेळी त्यांनी नमूद केलं. ते मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते.

    राऊत म्हणाले की, “एकेकाळी विरोधी पक्षनेतेही राज्याचे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्रात अमरावतीसारख्या घटना घडू नयेत, यासाठी विरोधी पक्षनेत्यांनी आगीत तेल न टाकता, ते शांत करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. अशा घटनांचं राजकारण, पेटवापेटवी ही महाराष्ट्राला परवडणारी नाही. महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे. आपण पाहिलं असेल त्याच अमरावतीच्या बाजूला पुढे विदर्भात, गडचिरोलीत, याच पोलिसांनी, याच सरकारनं 26 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. कायद्यापुढं सगळे समान आहेत. अमरावतीत दंगल कोणी पेटवली? कोणत्या कारणानं पेटवली? हे देशालाही माहीती आहे, राज्याच्या गृहमंत्र्यांनाही माहीत आहे आणि अमरावतीच्या जनतेलाही माहीत आहे. वातावरण सगळं शांत झालं असताना, उगाचंचं काड्या करणारं काम कोणीही करु नये, एवढंच मी त्यांना आमच्या पक्षातर्फे आणि महाविकास आघाडीतर्फे आवाहन करिन.” असं मत राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

    दरम्यान, ‘ज्या दिवशी घटना घडली तेव्हा जिल्हाधिकारी नव्हते, पोलीस नव्हते.’ असं म्हणत अमरावतीच्या यशोमती ठाकूर यांनी गुप्तचर यंत्रणा अपयश ठरल्याचं मान्य केलं आहे.