mumbai police using drone

प्रजासत्ताक दिन तोंडावर आला असतानाच राज्यावर ड्रोन हल्ल्याचे सावट आहे. त्यामुळे राज्याला केंद्रीय यंत्रणांकडून अलर्ट देण्यात आला आहे. यानंतर राजधानी मुंबईसह राज्यातील सर्व शहरांना अलर्ट देण्यात आला आहे. डार्क नेटवरुन दहशतवाद्यांचे संभाषण उघड झाल्यानंतर केंद्रीय यंत्रणांनी याबाबत माहिती दिली(Drone attack on Maharashtra; Central agencies issue alerts to all districts including Mumbai).

  मुंबई : प्रजासत्ताक दिन तोंडावर आला असतानाच राज्यावर ड्रोन हल्ल्याचे सावट आहे. त्यामुळे राज्याला केंद्रीय यंत्रणांकडून अलर्ट देण्यात आला आहे. यानंतर राजधानी मुंबईसह राज्यातील सर्व शहरांना अलर्ट देण्यात आला आहे. डार्क नेटवरुन दहशतवाद्यांचे संभाषण उघड झाल्यानंतर केंद्रीय यंत्रणांनी याबाबत माहिती दिली(Drone attack on Maharashtra; Central agencies issue alerts to all districts including Mumbai).

  डार्क नेटच्या माध्यमातून मुंबईसह राज्यात ड्रोन हल्ल्या घडवण्याबद्दल दहशतवादी संभाषण करत असल्याचे समोर आले आहे. जम्मू काश्मीर आणि पंजाबमध्ये ड्रोन हल्ल्यांची भीती नेहमीच व्यक्त केली जाते. पण मुंबई आणि महाराष्ट्रात ड्रोन हल्ल्यांबाबतचे संभाषण चौकशी यंत्रणांच्या हाती लागल्याने यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.

  राज्यात अँटीड्रोन सिस्टमच नाही

  डार्क नेटचे कारस्थान पुढे आल्यानंतर चिंता व्यक्त केली जात असतानाच राज्यात अँटीड्रोन सिस्टमही नसल्याचे समोर आले आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सायबर सुरक्षा प्रकल्प उभारण्याची घोषणा यापूर्वी केली होती. यापूर्वी 12 ऑक्टोबर 2020 रोजी मुंबई आणि पपरिसरात अचानक वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर झालेल्या तपासात तो सायबर हल्ला असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यावेळी महाट्रान्सकोच्या सर्व्हरवर 13 ट्रोजन हॉर्स असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.

  20 ते 30 कि.मी.वरून हल्ला शक्य

  ड्रोन हल्ल्यात 20 किमी ते 30 किमी अंतरावरूनही हल्ला केला जाऊ शकतो. ड्रोनवर पेलोड बसवता येतात. याशिवाय, त्यांना बॅकट्रॅक करणे फारसे सोपे नाही. जर एखाद्या गुन्हेगाराने मोबाईल फोन वापरला तर त्याचा आयएमईआय क्रमांकावरून शोध लावला जाऊ शकतो, परंतु ड्रोन मागे टाकून गुन्हेगाराचा शोध लावता येणे अशक्य आहे.

  दहशतवादी प्रवृत्तीच्या व्यक्ती ड्रोन हल्ले, रासायनिक हल्ले आणि सायबर हल्ल्यांबद्दल डार्क नेटवर चर्चा करत होते. टोर ब्राउझर हा डार्क नेटमध्ये वापरला जातो, जो सहज ट्रेस करता येत नाही. कारण त्यात अनेक प्रॉक्सी बाऊन्सिंगचा वापर केला जातो असे सायबर सेल कडून सांगण्यात आले.

  हे सुद्धा वाचा
  • 2022