मादक पदार्थांची नशा महाराष्ट्राच्या जीवावर, राज्यात आत्महत्येची सर्वाधिक प्रकरणे

केंद्र सरकारच्या (Central Government) प्रयत्नांनंतरही, मादक पदार्थांच्या (Drugs) नशेमुळे आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढत चाललेली आहे. २०१८ च्या तुलनेत २०२० साली नशेच्या सवयीमुळे त्रस्त असलेल्या अनेकांनी आत्महत्या (Suicide) केल्या असून, ही संख्या जास्त आहे. गेल्या तीन वर्षांत नशेतून आत्महत्या करणाऱ्यांची संख्या २४,२२२ इतकी आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने (Union Home Ministry) लोकसभेत (Loksabha) ही माहिती दिली आहे.

    मुंबई : मादक पदार्थांची (Drugs) नशा (Intoxication) अनेकांना आत्महत्येपर्यंत (Suicide) घेवून जात आहे. अशा प्रकरणांमध्ये गेल्या तीन वर्षांत वेगाने वाढ होताना दिसते आहे. नशेमुळे आत्महत्येच्या सर्वाधिक घटना या महाराष्ट्रात (Maharashtra) घडल्या आहेत. कर्नाटक (Karnataka) दुसऱ्या तर तामिळनाडू (Tamilnadu) अशा आत्महत्यांच्या प्रकरणात तिसऱ्या क्रमांकावर आहे.

    केंद्र सरकारच्या (Central Government) प्रयत्नांनंतरही, मादक पदार्थांच्या (Drugs) नशेमुळे आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढत चाललेली आहे. २०१८ च्या तुलनेत २०२० साली नशेच्या सवयीमुळे त्रस्त असलेल्या अनेकांनी आत्महत्या (Suicide) केल्या असून, ही संख्या जास्त आहे.

    गेल्या तीन वर्षांत नशेतून आत्महत्या करणाऱ्यांची संख्या २४,२२२ इतकी आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने (Union Home Ministry) लोकसभेत (Loksabha) ही माहिती दिली आहे. यात महाराष्ट्रात २०२० साली २४७९ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. तर २०१९ साली ही संख्या २२५६ इतकी सर्वाधिक होती. तर २०१८ साली २०१० जणांनी आत्महत्या केल्या होत्या.

    सरकारचे प्रयत्न

    हे सर्व रोखण्यासाठी सरकारकडूनही प्रयत्न सुरु आहेत. यात २७२ प्रभावित जिल्ह्यांमध्ये व्यसनमुक्ती मोहिमेंतर्गत ४२ लाख युवकांचे समुपदेशन करण्यात आले. याबाबत मुलांमध्ये जागरुकता यावी, यासाठीही प्रयत्न करण्यात येत आहेत. ३८० व्यसनमुक्ती केंद्र यासाठी चालवण्यात येत आहेत. गेल्या तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात मादक पदार्थ जप्तही करण्यात आले आहेत.