अंमली पदार्थाची विक्री करणारी टोळी गजाआड; दिंडोशी पोलिसांची कारवाई

मुंबईत अंमली पदार्थाची विक्री आणि स्वतःही सेवन करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा दिंडोशी पोलिसांनी छडा लावला आहे. यातील आरोपींकडून तब्बल १ कोटी ३ लाखांचा चरसचा साठा जप्त करण्यात आला असून, गौरव कुमार प्रसाद आणि कृष्ण कुमार पंडित या दोघांना अटक केली आहे(Drug trafficking gang disappears; Dindoshi police action).

    मुंबई : मुंबईत अंमली पदार्थाची विक्री आणि स्वतःही सेवन करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा दिंडोशी पोलिसांनी छडा लावला आहे. यातील आरोपींकडून तब्बल १ कोटी ३ लाखांचा चरसचा साठा जप्त करण्यात आला असून, गौरव कुमार प्रसाद आणि कृष्ण कुमार पंडित या दोघांना अटक केली आहे(Drug trafficking gang disappears; Dindoshi police action).

    गोरेगाव पूर्वेकडील दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवशाही भागातील मोकळ्या जागेत काहीजण चरस विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यानी दिली होती. याबाबत शहानिशा करण्यासाठी समाधान वाघ यांच्यासह पोलिसांनी येथे पाळत ठेवली. यावेळी पोलिसांनी,२ पथके ही तयार केली. त्यानंतर योगेश कन्हेरकर आणि निगराणी पथकाचे प्रमुख उप निरीक्षक राजूबनसोडे यांच्या अधिपत्याखाली ही पथके कार्यरत झाली.

    वेशांतर करुन दोघांना अटक

    पोलिसांनी वेषांतर करून या दोघा आरोपींना ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांच्याकडे ३ हजार ग्रॅम वजनाचे आणि २ कोटी ३ लाख किमतीचे चरस जप्त करण्यात आले. त्यांच्या विरुद्ध दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांची सध्या चौकशी केली जात असून, हे चरस कोठून आणले, कोणास देणार होते याबाबत तपास केला जात आहे. दरम्यान, पोलिसांच्या उत्तर प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त प्रविण पडवळ आणि परिमंडळ १२ चे उपायुक्त सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक जीवन खरात यांनी ही कामगिरी केली.