कर्तव्यदक्ष सरकार! पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

अमोल येडगे, आयएएस (एमएच: २०१), मुख्य कार्यकारी अधिकारी, झेडपी, अमरावती यांना जिल्हाधिकारी, यवतमाळ म्हणून नियुक्त केले गेले आहे.

    मुंबई : बदल्यांवरुन राजकीय वातावरण तापले असतानाच राज्य सरकारने पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात लोकेश चंद्र, आयएएस (१९९३) यांची प्रधान सचिव (एआर ॲन्ड ओएम), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राजीव कुमार मित्तल, आयएएस (१९९८) सचिव , वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई यांना आयुक्त, विक्रीकर, महाराष्ट्र राज्य, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

    अमोल येडगे, आयएएस (एमएच: २०१), मुख्य कार्यकारी अधिकारी, झेडपी, अमरावती यांना जिल्हाधिकारी, यवतमाळ म्हणून नियुक्त केले गेले आहे.

    अविशांत पांडा, आयएएस (एमएच: २०१) सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, तळोदा, नंदुरबार यांना सीईओ, जि.प., अमरावती म्हणून नियुक्त केले गेले आहे. वासुमाना पंत, आयएएस (एमएच: २०१७) सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, नंदुरबार यांना सीईओ, झेडपी, वाशिम म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.