E-commerce has given impetus to the cashless facility in the country; Organizing 'National Language Competitions' at Central Railway Headquarters

‘देशात ई कॉमर्सचा विस्तार, संधी आणि आव्हाने’ या विषयावर हिंदी वक्तव्य स्पधेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी उपस्थिती स्पर्धकांचे मार्गदर्शन करताना मत व्यक्त केले. उत्तर मध्य रेल्वेच्या मुख्यालयात ‘राष्ट्रभाषा स्पर्धां’चे आयोजन करण्यात आले होते. महाव्यवस्थापक प्रमोद कुमार यांच्या निर्देशानुसार आणि मुख्य राष्ट्रभाषा अधिकारी आणि प्रमुख अर्थ सल्लागार/उत्तर मध्य मुंबई रेल्वेचे अजय माथूर यांनी यावेळी उपस्थितांचे मार्गदर्शन केले. राष्ट्रभाषा पंधरवडा आणि राष्ट्रभाषा सप्ताहांतर्गत विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

  मुंबई : देशात ई काॅमर्सचा विस्तार करण्याचा महत्त्वाच उद्देश म्हणजे रोख रक्कमेचा वापर कमी करून सुरक्षित आणि पारदर्शक व्यवहाराचा चालना देणे आहे. ई कॉमर्समुळे देशात कॅशलेस सुविधेला चालना मिळाली आहे, असे मत राष्ट्रभाषा अधिकारी आणि प्रधान अर्थ सल्लागार अजय माथूर यांनी व्यक्त केले.

  ‘देशात ई कॉमर्सचा विस्तार, संधी आणि आव्हाने’ या विषयावर हिंदी वक्तव्य स्पधेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी उपस्थिती स्पर्धकांचे मार्गदर्शन करताना मत व्यक्त केले. उत्तर मध्य रेल्वेच्या मुख्यालयात ‘राष्ट्रभाषा स्पर्धां’चे आयोजन करण्यात आले होते. महाव्यवस्थापक प्रमोद कुमार यांच्या निर्देशानुसार आणि मुख्य राष्ट्रभाषा अधिकारी आणि प्रमुख अर्थ सल्लागार/उत्तर मध्य मुंबई रेल्वेचे अजय माथूर यांनी यावेळी उपस्थितांचे मार्गदर्शन केले. राष्ट्रभाषा पंधरवडा आणि राष्ट्रभाषा सप्ताहांतर्गत विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

  माथूर यांनी सांगितले की, महामारीदरम्यान भारतीय रेल्वेने विविध पावत्यांचे तंत्रज्ञानाच्या माध्यमाद्वारे सुरक्षित आदान-प्रदान केले आहे. ई कॉमर्स वस्तुत: आपली प्रगती आणि विकासाचे सूचक आहे आणि येणाऱ्या काळात ई कॉमर्स क्षेत्रांमधील त्रृटींवरही तोडगा काढण्यात येईल, असे ते म्हणाले.
  या स्पर्धेत सुरूवातीला ‘क्रीडा क्षेत्रात भारताला अग्रणी राष्ट्र बनवण्याचे उपाय’ या विषयावर हिंदी निबंध स्पर्धा तसेच हिंदी टिप्पण आणि प्रारूप लेखन स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले. हिंदी टिप्पण आणि प्रारूप लेखन स्पर्धेत वाहतूक निरीक्षक विकास प्रसाद यांना प्रथम क्रमांक मिळाला. तर मुख्य कार्यालय अधीक्षक अभय कुमार सिन्हा द्वितीय तर मुख्य सतर्कता निरीक्षक अनिरुद्ध कुमार शुक्ला यांनी तृतीय क्रमांक पटकावला. हिंदी निबंध स्पर्धेत वरिष्ठ लिपिक राम प्रवेश शाह यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर वाहतूक निरीक्षक विकास प्रसाद द्वितीय तर सेक्शन इंजिनिअर राधेश्याम वर्मा यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

  ई-कॉमर्सच्या प्रयोग, प्रसारात त्याच्या तांत्रिक आणि पारिभाषिक शब्दांचे महत्त्वाचे स्थान आहे आण्िा प्रत्येक व्यक्तीला याची माहिती होणे आवश्यक आहे. सायबर सुरक्षा ई कॉमर्सशी संलग्न असलेला महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील पैलू आहे. याबाबत महत्त्वाचे निर्णय होत आहे. नागरिकांनीही सायबर सुरक्षेबाबत जागृत राहणे सध्याच्या घडीला आवश्यक आहे.

  -डॉ. शिवम शर्मा, मुख्य जनसंपर्क अधिकारी