अडसूळांची प्रकृती ठणठणीत ईडीचा न्यायालयात दावा; उद्या होणार सुनावणी

माजी खासदार आनंद अडसूळ आणि त्यांचे पुत्र माजी आमदार अभिजीत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशीचा समन्स बजावले आहे. तसेच त्यांच्या कांदिवली येथील घर आणि कार्यालयातही ईडीने तपास केला होता. ईडीचे अधिकारी आनंदराव अडसूळ यांच्या घरी गेले होते. त्यांची चौकशी सुरु असताना अडसूळ यांची अचानक तब्येत बिघडली होती. यानंतर त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मात्र, शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करत अटकेपासून दिलासा देण्याची मागणीसाठी मुंबई उच्च न्यालयात धाव घेतली होती. आज न्यायालयात अडसूळ यांच्या विनंती याचिकेवर सुनावणी पार पडली

  मुंबई : सिटी को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर असलेले माजी खासदार आणि शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांची प्रकृती ठणठणीत असल्याचा दावा ईडीने आज मुंबई हायकोर्टात केला. तर जात पडताळणीवर आक्षेप घेतल्याने विनाकारण या प्रकरणात त्यांना गोवल्याची बाजू अडसूळ यांच्या वकिलांनी मांडली. दोन्ही वाद- प्रतिवाद्यांचे म्हणणे न्यायालयाने ऐकूण घेतले असून, यावर उद्या सुनावणी होणार आहे.

  अडसूळ यांची प्रकृती ठणठणीत- ईडी

  शिवसेनेचे माजी खासदार आनंद अडसूळ आणि त्यांचे पुत्र माजी आमदार अभिजीत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशीचा समन्स बजावले आहे. तसेच त्यांच्या कांदिवली येथील घर आणि कार्यालयातही ईडीने तपास केला होता. ईडीचे अधिकारी आनंदराव अडसूळ यांच्या घरी गेले होते. त्यांची चौकशी सुरु असताना अडसूळ यांची अचानक तब्येत बिघडली होती. यानंतर त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मात्र, शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करत अटकेपासून दिलासा देण्याची मागणीसाठी मुंबई उच्च न्यालयात धाव घेतली होती. आज न्यायालयात अडसूळ यांच्या विनंती याचिकेवर सुनावणी पार पडली आहे. या सुनावणी दरम्यान आनंदराव अडसूळ यांची प्रकृती ठणठणीत असून त्यांना काहीही झालेल नाही असा दावा ईडीने न्यायालयात केला आहे. अडसुळांना आज रूग्णालयातून डिस्चार्ज मिळणार, मात्र ईडीचे अधिकारी तिथेच ताब्यात घेण्याच्या तयारीत असल्याने अशा प्रकारचे कारण देत ईडीच्या चौकशीतून अडसूळ पळ काढत असल्याचा दावाही ईडीने केला आहे.

  प्रकरणात विनाकारण गोवले

  अडसुळांनी प्रतिपक्षाच्या नेत्याविरोधात जातपडताळणी प्रमाणपत्राची तक्रार दिली होती, म्हणून हे प्रकरण विनाकारण उकरून काढल्यात आल्याचा आरोप अडसुळंच्या वकिलाने उच्च न्यालयालात केला. तर हे प्रकरण एका बँकेच्या आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित आहे. या प्रकरणाचा निवडणूक प्रकरणाशी काहीही संबंध नाही असा प्रतिवाद ईडीने न्यायालयात केला आहे. दोन्ही वादी- प्रतिवाद्यांचे म्हणणे न्यायालयाने ऐकूण घेतले असून यावर उद्या सुनावणी होणार आहे.

  अडसुळांवर काय आहेत आरोप ?

  आनंदराव अडसूळ यांनी सिटी को-ऑप बँकेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप बडनेराचे आमदार रवी राणा यांनी केला होता. तसेच या संदर्भातील पुरावे काही दिवसांपूर्वी ईडीकडे सादर केले होते. सिटी को-ऑप बँकेच्या मुंबईमध्ये १३-१४शाखा आहेत. तर या बँकेत ९ हजार खातेधारक होते. त्या बँकेतील खातेदारांचे पैसे अवैधरित्या बिल्डरांना वाटण्यात आले आहे. त्यात अडसूळांनी २० टक्के कमिशन घेतले. त्यामुळे बँक पूर्ण बुडाली. यामध्ये जवळपास ९८० कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप रवी राणांनी केला होता.