ईडीचे देशमुखांना तिसऱ्यांदा समन्स, ‘या’ ६ मुद्द्यांच्या सविस्तर माहितीशी संबंधित कागदपत्रांसह पुढील चौकशीसाठी समक्ष हजर राहण्याची मागणी

ईडीच्या(Ed) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल देशमुख(Information Of Anil Deshmukh) यांच्याकडे सहा मुद्द्यांबाबत सविस्तर माहिती मागविण्यात आली आहे. या माहितीशी संबंधित कागदपत्रांसह पुढील चौकशीसाठी त्यांना समक्ष हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

  मुंबई : सक्त वसुली संचालनालय (ईडी)(Ed) कडून माजी गृहमंत्री अनिल देशमुख(Anil Deshmukh) यांनी विचारलेल्या माहितीच्या संदर्भात मोठी कागदपत्रांची यादी आणि तपशील विचारण्यात आल्याने चौकशीला विलंब होवून देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संदर्भात अद्याप ईडीने पाठविलेल्या कागदपत्रांच्या यादीमध्ये अनेक मागण्या केल्या आहेत.

  गेल्या पाच वर्षांच्या उत्पन्नाचा तपशील
  देशमुख यांनी तपासासाठी आठ दिवसांची मुदतवाढ मागितल्यानंतर गेल्या पाच वर्षांच्या उत्पन्नाचा तपशील ईडीला हवा आहे. याशिवाय संपूर्ण मालमत्तेची माहिती आवश्यक आहे. साई एज्युकेशनल संस्थेशी त्यांचा काय संबंध आहे, यासंबंधीचे सर्व तपशील त्यांच्या वैयक्तिक सचिव आणि पी.ए. संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांच्याकडून मागविण्यात आले आहेत.

  चौकशीसाठी समक्ष हजर राहण्याचे समन्स
  ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल देशमुख यांच्याकडे सहा मुद्द्यांबाबत सविस्तर माहिती मागविण्यात आली आहे. या माहितीशी संबंधित कागदपत्रांसह पुढील चौकशीसाठी त्यांना समक्ष हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. या माहितीच्या आधारेच त्यांची चौकशी केली जाईल, असे अनिल देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंह यांनी सांगितले आहे.

  दरम्यान, अनिल देशमुख यांनी मुंबईतील बारमालकांकडून घेतलेला पैसा सनदी लेखापालाच्या माध्यमातून या बनावट कंपन्यांत पैसा गुंतविण्यात आला आहे. ही कंपनी कोलकात्याच्या पत्त्यावर नोंदविण्यात आली आहे. हा व्यवहार सुमारे २० कोटी रुपयांचा असल्याची माहिती ‘ईडी’ला मिळाल्याने हा तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.