लेटरबॉम्ब प्रकरणात आता ‘ईडी’च्या प्रवेशाची चिन्हं, गृहमंत्री देशमुखांच्या अडचणी वाढणार?

परमबीर सिंग लेटर बॉम्ब प्रकरणी आता ईडी (सक्तवसुली संचालनालय) चौकशी करेल, अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. मुंंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा जबाब नोंदवून ईडी आपला तपास सुरू करेल, अशी शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे. हे प्रकरण केवळ गुन्हेगारीचं नसून त्यामध्ये मोठ्या आर्थिक व्यवहारांचा संबंध असल्यामुळे ईडीकडूनच या प्रकरणाची चौकशी केली जावी, अशी मागणी भाजपमधील काही नेत्यांनी केंद्राकडं केल्याचं समजतंय. 

    मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री आणि राज्यपालांना पत्र लिहून केलेल्या आरोपानंतर देशभर खळबळ उडालीय. राष्ट्रवादी काँग्रेसकडे यामुळे संशयाची सुई वळाली असून याप्रकरणी केंद्राने चौकशी करावी, अशी मागणी भाजप आणि मनसेच्या स्थानिक नेत्यांनी केली होती. त्यानुसार आता केंद्र सरकारनं हालचाली सुरू केल्याचं चित्र दिसू लागलं आहे.

    परमबीर सिंग लेटर बॉम्ब प्रकरणी आता ईडी (सक्तवसुली संचालनालय) चौकशी करेल, अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. मुंंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा जबाब नोंदवून ईडी आपला तपास सुरू करेल, अशी शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे. हे प्रकरण केवळ गुन्हेगारीचं नसून त्यामध्ये मोठ्या आर्थिक व्यवहारांचा संबंध असल्यामुळे ईडीकडूनच या प्रकरणाची चौकशी केली जावी, अशी मागणी भाजपमधील काही नेत्यांनी केंद्राकडं केल्याचं समजतंय.

    हा केवळ पोलिसांमधील अंतर्गत स्पर्धेपुरता मर्यादित विषय नसून मोठे मासे यात असण्याची शक्यता आहे. जर केंद्रीय तपास यंत्रणेकडून याची चौकशी झाली, तर फटाक्यांची माळ लागेल, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी म्हटलं होतं. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी भाजपनं राज्यभर आंदोलनं केली. मात्र पदावरून काढल्याच्या रागातून परमबीर सिंग यांनी हे आरोप केले असल्यामुळे त्याला गांभिर्यानं घेण्याची गरज नाही, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसनं अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

    दरम्यान, दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेले आरोप हे धादांत खोटे असून ते स्वतःचा बचाव करण्यासाठी असे दावे करत असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलंय. आपल्याला आणि महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचलं जात असल्याचा दावा देशमुखांनी केलाय.