अनिल देशमुखांच्या घरावर ईडीचे छापे, सुप्रिया सुळे संतापल्या, म्हणाल्या की…

ईडीने केलेल्या या कारवाईवर सुप्रिया सुळेंनी संताप व्यक्त केला आहे. देशातील यंत्रणांचा इतक्या प्रमाणात गैरवापर होताना कधीही पाहिलं नव्हतं, असा गंभीर आरोप सुप्रिया सुळेंनी सत्ताधारी भाजपवर केला आहे. केंद्रिय यंत्रणांचा चुकीच्या पद्धतीनं वापर केला जात आहे. ईडीची कारवाई राजकीय सूडापोटी केली जाते हे स्पष्ट दिसतंय. तसेच ईडीची कारवाई आणीबाणीची आठवण करुन देणारी असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

    मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. महिनाभरानंतर अनिल देशमुख यांच्या निवासस्थानावरील ही दुसरी धाड आहे. यापूर्वी सीबीआयने अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकला होता. या कारवाईवर राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    ईडीने केलेल्या या कारवाईवर सुप्रिया सुळेंनी संताप व्यक्त केला आहे. देशातील यंत्रणांचा इतक्या प्रमाणात गैरवापर होताना कधीही पाहिलं नव्हतं, असा गंभीर आरोप सुप्रिया सुळेंनी सत्ताधारी भाजपवर केला आहे. केंद्रिय यंत्रणांचा चुकीच्या पद्धतीनं वापर केला जात आहे. ईडीची कारवाई राजकीय सूडापोटी केली जाते हे स्पष्ट दिसतंय. तसेच ईडीची कारवाई आणीबाणीची आठवण करुन देणारी असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

    दरम्यान, अनिल देशमुख यांच्यावर वसुली आदेशाचा गंभीर आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. त्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. या गुन्हाच्या अनुषंगाने ईसीआयर दाखल करत ईडीने तपास सुरु केला होता. ईडीने आज सकाळी देशमुखांच्या नागपुरातील घरी छापेमारी केली. यावेळी केंद्रीय सुरक्षा यंत्रणा सीआरपीएफचे जवान मोठ्या प्रमाणात तैनात आहेत.