ईडीकडून अनिल परबांची तब्बल ८ तास चौकशी, तपासाला सहकार्य करणार – परब

आज मला जे समन्स आलं होतं त्या अनुषंगाने ईडीच्या कार्यालयात आलो. अधिकाऱ्यांनी जे प्रश्न मला विचारले त्या सगळ्यांची उत्तरं देता आली. त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी त्यांना दिली आहेत. ईडी ही एक अथॉरिटी आहे. त्यामुळे त्यांना उत्तरं देणं ही माझी जबाबदारी आहे. कुणा वैयक्तिक व्यक्तीला उत्तर देण्यास मी बांधील नाही. यापुढेली मी ईडीला सहकार्य करणार. ईडीच्या अधिकाऱ्याचं समाधान झालं की नाही याबाबत मी सांगू शकत नाही. मात्र, मला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मी त्यांना दिली आहेत’, असं अनिल परब म्हणाले.

    मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब तब्बल ८ तासानंतर ईडी कार्यालयातून बाहेर पडले. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून त्यांची तब्बल ८ तास चौकशी झाली. सकाळी ११ वाजता अनिल परब ईडी कार्यालयात दाखल झाले होते. त्यानंतर संध्याकाळी ७ वाजता ते ईडी कार्यालयातून बाहेर पडले. त्यावेळी आपण ईडी अधिकाऱ्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरं दिल्याचं अनिल परब म्हणाले. तसंच यापुढेही ईडीला पूर्ण सहकार्य करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

    आज मला जे समन्स आलं होतं त्या अनुषंगाने ईडीच्या कार्यालयात आलो. अधिकाऱ्यांनी जे प्रश्न मला विचारले त्या सगळ्यांची उत्तरं देता आली. त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी त्यांना दिली आहेत. ईडी ही एक अथॉरिटी आहे. त्यामुळे त्यांना उत्तरं देणं ही माझी जबाबदारी आहे. कुणा वैयक्तिक व्यक्तीला उत्तर देण्यास मी बांधील नाही. यापुढेली मी ईडीला सहकार्य करणार. ईडीच्या अधिकाऱ्याचं समाधान झालं की नाही याबाबत मी सांगू शकत नाही. मात्र, मला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मी त्यांना दिली आहेत’, असं अनिल परब म्हणाले.

    ईडीने मला आज चौकशीला बोलावलं आहे. त्यामुळे मी चौकशीला सामोरे जात आहे. माझ्याकडून कोणतीही चूक झाली नाही. हे मला नक्की माहीत आहे, असं ते म्हणाले. इतर शिवसेना नेत्यांचीही ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. त्यावर त्यांची प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी त्यावर बोलण्यास नकार दिला. मी माझ्या बाबतीत बोलत आहेत. इतरांबद्दल बोलणार नाही, असंही ते म्हणाले होते.

    दरम्यान, सकाळी ईडीच्या चौकशीला जाण्यापूर्वी परब यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. मला ईडीचं दुसरं समन्स मिळालं आहे. मी चौकशीला जात आहे. शिवसेनाप्रमुख आणि मुलीची शपथ घेऊन मागे सांगितलं आहे की, मी काहीही चुकीचं काम केलं नाही. चौकशीत जे प्रश्न विचारले जातील त्याचे उत्तर देईल. कशासाठी बोलावलं मला माहीत नाही. मला कोणतंही स्पष्ट कारण दिलं नाही. चौकशीला गेल्यावर कळेल. असं परब म्हणाले होते.