एकनाथ खडसे पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह, ईडीला सीडी कधी लावणार?

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (NCP leader Eknath Khadse) यांना ईडीने (ED) नोटीस बजावल्यानंतर त्यांनी ईडी कार्यालयात हजर राहणार असल्याचं सांगितलं होतं. परंतु ईडीला सीडी लावण्यापूर्वीच त्यांना कोरोना विषाणूने (Corona Virus) पुन्हा एकदा विळखा घातला आहे.

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (NCP leader Eknath Khadse) यांना ईडीने (ED) नोटीस बजावल्यानंतर त्यांनी ईडी कार्यालयात हजर राहणार असल्याचं सांगितलं होतं. परंतु ईडीला सीडी लावण्यापूर्वीच त्यांना कोरोना विषाणूने (Corona Virus) पुन्हा एकदा विळखा घातला आहे. एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा कोरोनाची बाधा झाली असून त्यांनी स्वत: ट्विट (Tweet) करून माहिती दिली आहे.

सर्दी, खोकला आणि ताप आल्याने आपण कोरोनाची चाचणी (Corona Test) केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे ईडी कार्यालयात जाण्याऐवजी १४ दिवस विश्रांती घेत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. एक ट्विट करुन त्यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.

दरम्यान, या आधी खडसेंना नोव्हेंबर महिन्यातही कोरोनाची बाधा झाली होती. त्यांना उपचारांसाठी मुंबईतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळीही त्यांनी ट्विट करुन कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली होती. तसंच संपर्कात आलेल्या सगळ्यांनी कोरोनाची चाचणी करुन घ्यावी असंही आवाहन केलं होतं. परंतु आज पुन्हा एकदा कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्यांनी १४ दिवस विश्रांती घेण्याचा निर्णय वैद्यकीय सल्ल्यामुळे घेतला आहे.