खडसे म्हणतात बुधवारी ईडीच्या कार्यालयात जाईन आणि…

३० डिसेंबरला आपल्याला चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना ईडीच्या नोटीशीत करण्यात आली असून आपण या सूचनेचं पालन करू, असं एकनाथ खडसेंनी म्हटलंय. बुधवारी आपण ईडीच्या कार्यालयात हजर राहून चौकशीला पूर्ण सहकार्य करू, अशी घोषणा त्यांनी केलीय. या प्रकरणात आपली पाचव्यांदा चौकशी होत असल्याचंही ते म्हणाले.

भाजपमधून काही आठवड्यांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले एकनाथ खडसे यांना अंमलबजावणी संचालनालय (ED) नं नोटीस पाठवलीय. ही नोटीस आपल्याला मिळाली असून बुधवारी आपण ईडी कार्यालयात हजर होऊ, असं एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

३० डिसेंबरला आपल्याला चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना ईडीच्या नोटीशीत करण्यात आली असून आपण या सूचनेचं पालन करू, असं एकनाथ खडसेंनी म्हटलंय. बुधवारी आपण ईडीच्या कार्यालयात हजर राहून चौकशीला पूर्ण सहकार्य करू, अशी घोषणा त्यांनी केलीय. या प्रकरणात आपली पाचव्यांदा चौकशी होत असल्याचंही ते म्हणाले.

तांत्रिकदृष्ट्या भोसरी येथील भूखंड हा आपल्या पत्नीच्या नावे असल्याचा खुलासा त्यांनी केला. कदाचित एकत्र कुटुंब म्हणून आपल्या नावे ही नोटीस आली असावी, असंही त्यानीं म्हटलंय. २०१४ मध्ये भाजप सेना युतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर काही महिन्यांतच हे प्रकरण समोर आलं होतं. त्यानंतर एकनाथ खडसेंना राजीनामाही द्यावा लागला होता.

देवेंद्र फडणवीस यांनी जाणीवपूर्वक आपली राजकीय कारकीर्द संपवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप एकनाथ खडसेंनी केला होता. भाजपला सोडचिठ्ठी देतानादेखील देवेद्र फडणवीस यांच्यामुळे आपण पक्ष सोडत असल्याची जाहीर टीका त्यांनी केली होती.