२०२१ मध्ये निवडणुकांची रणधुमाळी; महाविकासआघाडी Vs भाजप-मनसे-MIM असा सामना?

राज्य निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद, कोल्हापूर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि वसई-विरार या पाच महानगरपालिकांसाठी फेब्रुवारी महिन्यात निवडणूक होणार आहे. याशिवाय, राज्यातील ९६ नगरपालिकांसाठीही फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरार्धात निवडणुका पार पडतील. त्यामुळे राज्यात फेब्रुवारी महिन्यात पुन्हा  एकदा महाविकास विरुध्द भाजप, मनसे, एमआयएम आणि अन्य पक्ष असा सामना अनुभवायला मिळू शकते. नुकत्याच पार पडलेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या महाविकासआघाडीने भाजपला धूळ चारली होती. त्यामुळे सध्या महाविकास आघाडीसाठी राज्यभरात अनुकूल वातावरण असल्याची चिन्हे आहेत.

मुंबई  : कोरोना संकटामुळे लांबणीवर पडलेल्या राज्यातील पाच महानगरपालिकांसह ९६नगरपालिकांच्या निवडणूका फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी एकत्रितपणे या निवडणुकांना सामोरी जाणार आहे.

राज्य निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद, कोल्हापूर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि वसई-विरार या पाच महानगरपालिकांसाठी फेब्रुवारी महिन्यात निवडणूक होणार आहे. याशिवाय, राज्यातील ९६ नगरपालिकांसाठीही फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरार्धात निवडणुका पार पडतील.

त्यामुळे राज्यात फेब्रुवारी महिन्यात पुन्हा  एकदा महाविकास विरुध्द भाजप, मनसे, एमआयएम आणि अन्य पक्ष असा सामना अनुभवायला मिळू शकते. नुकत्याच पार पडलेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या महाविकासआघाडीने भाजपला धूळ चारली होती. त्यामुळे सध्या महाविकास आघाडीसाठी राज्यभरात अनुकूल वातावरण असल्याची चिन्हे आहेत.

याचाच फायदा घेत फेब्रुवारी महिन्यात बड्या महानगरपालिकांच्या निवडणुका उरकण्याचे महाविकासच्या नेत्यांनी ठरवले असावे, असे राजकीय निरिक्षकांचे मत आहे.

जानेवारीत ग्रामपंचायत निवडणुकांचा ‘धुरळा’

जानेवारी महिन्यात राज्यातील १४,२३२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी १५ जानेवारीला मतदान होत आहे. १८ जानेवारीला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. या निवडणुकीत महाविकास आघाडीने विधानपरिषद निवडणुकीतील कामागिरीची पुनरावृत्ती करायचे ठरवले आहे.

तर, भाजपने विधानपरिषद निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीत जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुका रंगतदार होण्याची शक्यता आहे.

आगामी काळात ज्या महापलिकांच्या निवडणुका होणार आहेत त्यांत नवी मुंबई १११, औरंगाबाद ११३, वसई-विरार : ११५, कल्याण डोंबिवली १२२, कोल्हापूर ८१ जागांसाठी निवडणुका होवू घातल्या आहेत.