विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक: माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब; सहकारी पक्षांच्या नेत्यांसोबतही चर्चा सुरू

विधानसभेचे दोन आठवड्याचे (पाच दिवस) अधिवेशन मुंबईत होणार असून या अधिवेशनात नाना पटोले यांनी राजीनामा दिल्याने रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक अपेक्षीत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या जागेवर कॉंग्रेसच्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावावर पक्षात सहमती झाली असून सहकारी पक्षांच्या नेत्यांसोबतही याबाबत चर्चा सुरू आहेत(Election of Assembly Speaker: Sealed in the name of former Chief Minister Prithviraj Chavan; Discussions also started with the leaders of the co-operative parties).

    मुंबई : विधानसभेचे दोन आठवड्याचे (पाच दिवस) अधिवेशन मुंबईत होणार असून या अधिवेशनात नाना पटोले यांनी राजीनामा दिल्याने रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक अपेक्षीत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या जागेवर कॉंग्रेसच्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावावर पक्षात सहमती झाली असून सहकारी पक्षांच्या नेत्यांसोबतही याबाबत चर्चा सुरू आहेत(Election of Assembly Speaker: Sealed in the name of former Chief Minister Prithviraj Chavan; Discussions also started with the leaders of the co-operative parties).

    येत्या दोन दिवसांत याबाबत मुख्यमंत्र्याशी कॉंग्रेस नेते बोलणार असून अंतिम निर्णय स्पष्ट होण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसकडेच असेल याबाबत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी स्पष्ट केले होते. यापूर्वी विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून संग्राम थोपटे, सुरेश वरपूडकर आणि अमीन पटेल यांच्या नावाची चर्चा सुरु होती.

    याबाबत पावसाळी अधिवेशनात प्रयत्न करण्यात आला नाही कारण या अधिवेशनाचा कालावधी अत्यंत कमी होता. त्याशिवाय विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यासाठीच्या नियमांत आता बदल करण्यात आला असून आवाजी मतदानाने ही निवड केली जाणार असल्याने या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी याबाबतचा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. गुप्त मतदानाऐवजी आवाजी मतदानाने निवड करण्यासाठी विधेयक मांडण्यात येणार आहे. दरम्यान  विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुक घेण्याबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यानी देखील राज्य सरकारला पत्र लिहिले होते.