आज सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षाची नारायण राणेंच्या उपस्थितीत निवड, तर  नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर दुपारी सुनावणी

भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज दुपारी सुनावणी होणार आहे, तर महाराष्ट्रभर चर्चा झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीचा आज आणखी टप्पा पार पडणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक जिल्हा बँक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक आज पार पडणार आहे. त्यामुळं अध्यक्षपदाची माळ कुणाचा गळ्यात पडते याकडे लक्ष लागले आहे.

    सिंधुदुर्ग : शिवसैनिक संतोष परब मारहाण प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज दुपारी सुनावणी होणार आहे, तर महाराष्ट्रभर चर्चा झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीचा आज आणखी टप्पा पार पडणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक जिल्हा बँक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक आज पार पडणार आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं केंद्रीय मंत्री नारायण राण जिल्हा बँकेत उपस्थित राहून नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा सन्मान करतील, अशी शक्यता असल्याची माहिती आहे. त्यामुळं अध्यक्षपदाची माळ कुणाचा गळ्यात पडते याकडे लक्ष लागले आहे.

    तर दुसरीकडे शिवसैनिक संतोष परब मारहाण प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनासासंदर्भातील याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. ही सुनावणी ऑनलाईन पार पडणार असून यामध्ये नेमकं काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळं ही सुनावणी ऑनलाईन होण्याची शक्यता आहे. त्यामुळं सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आजचा दिवस महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सकाळी 9:30 वाजता अध्यक्ष,उपाध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. सकाळी 10 वाजता नामनिर्देशन दाखल होईल आणि त्यानंतर अर्जाची छाननी झाल्यावर दुपारी बारा वाजेपर्यंत मतदान होईल. मतदानानंतर एक ते दोन वाजेपर्यंत निकाल येण्याची शक्यता आहे. त्यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष कार्यभार स्वीकारतील. त्यामुळं आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत.

    आमदार नितेश राणेच्या अटकपूर्व जामीन अर्जावर दुपारी सुनावणी

    भाजप आमदार नितेश राणेंच्या संतोष परब मारहाण प्रकरणी अटकपूर्व जामीनावर मुंबई हायकोर्टात दुपारी 1:00 वाजता सुनावणी होणार आहे. आमदार नितेश राणेंचे वकील संग्राम देसाई हे कुडाळ मधून ऑनलाईन युक्तिवाद करतील, अशी माहिती देखील मिळाली आहे. कोरोनाच्या धरतीवर आजची सुनावणी ऑनलाईन होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.