Dadra Nagar Haveli MP Mohan Sanjibhai Delkar's suicide note names Gujarat officials and former ministers

दाखल कऱण्यात आलेली एफआयआर बिनबुडाची आणि चुकीची आहे. आपल्याविरोधात एफआयआरमध्ये कोणताही विशिष्ट आरोप करण्यात आलेला नाही. आपली आणि देलकरांची वैयक्तिक ओळख नव्हती, देलकरांच्या संस्थेची आपण चौकशी केली होती. तसेच सदर घटना ही मुंबईत घडली असली तरी कथित गुन्ह्याचे मूळ दादरा नगर हवेलीमधले दडले आहे. त्यामुळे एफआयआर तिथे वर्ग होणे अपेक्षित होते. असा दावा जिल्हाधिकाऱ्यांच्या याचिकेतून करण्यात आला आहे.

  दादरा नगर हवेली येथील खासदार मोहन देलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी दाखल करण्यात आलेली एफआयआर रद्द करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सिल्वासा येथील जिल्हाधिकारी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्याची दखल घेत खंडपीठाने त्यावर गुरुवारी (आज) तातडीने सुनावणी निश्चित केली आहे.

  खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथील हॉटेल सी ग्रीनमध्ये २२ फेब्रुवारी रोजी पंख्याला लटकून आत्महत्या केली होती. डेलकर यांनी आत्महत्या केल्याने अनेकांना धक्का बसला. दादरा-नगर हवेलीच्या खासदारानी मुंबईत आत्महत्या का केली, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

  गुजराती भाषेत लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांकडून सातत्याने मानसिक छळ होत असल्याचे लिहिले होते. काही व्यक्तींची नावेही चिठ्ठीत होती. त्याचा तपास करून पोलिसांनी देलकारांचा मुलगा अभिनव यांच्या सांगण्यावरून तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी सिव्हासा, दादरा नगर हवेली येथील जिल्हाधिकारी संदीप कुमार सिंह यांनाही आरोपी करण्यात आले आहे. त्यावर संदीप कुमार सिंह यांनाही उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे.

  दाखल कऱण्यात आलेली एफआयआर बिनबुडाची आणि चुकीची आहे. आपल्याविरोधात एफआयआरमध्ये कोणताही विशिष्ट आरोप करण्यात आलेला नाही. आपली आणि देलकरांची वैयक्तिक ओळख नव्हती, देलकरांच्या संस्थेची आपण चौकशी केली होती. तसेच सदर घटना ही मुंबईत घडली असली तरी कथित गुन्ह्याचे मूळ दादरा नगर हवेलीमधले दडले आहे. त्यामुळे एफआयआर तिथे वर्ग होणे अपेक्षित होते. असा दावा जिल्हाधिकाऱ्यांच्या याचिकेतून करण्यात आला आहे.

  तसेच मागील काही दिवसांपासून गाजत असलेल्या माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बमध्येही सदर प्रकऱण हे दादरा नगर हवेलीकडे वर्ग करावे असे परमबीर सिंग यांनीही वरिष्ठांना सुचवले होते. मात्र, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या दबावामुळे इथे एसआयटी स्थापन करण्यात आली असल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे. सदर याचिकेवर बुधवारी न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. मनिष पितळे यांच्या खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणी पार पडली. तेव्हा, याचिकाकर्त्यांची बाजू ऐकून घेत सदर प्रकरणी माहिती घेऊन न्यायालयात सादर करा, असे तोंडी निर्देश राज्य सरकाला देत खंडपीठाने याचिकेवर गुरुवारी (आज) तातडीने सुनावणी निश्चित केली.

  मोहन डेलकर (५८) हे १९८९ पासून दादरा आणि नगर हवेली लोकसभा मतदारसंघातील खासदार होते. ते दादरा आणि नगर हवेली येथून ७ वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. २००९ मध्ये ते काँग्रेस पक्षात दाखल झाले. परंतु २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरत मोठ्या मतांनी पुन्हा विजयी झाले होते.