तिसऱ्या लाटेचा धोका; कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने पालिकेने खबरदारी घेतली आहे. उत्सवांमुळे वाढलेली गर्दी, गावावरून मुंबईत परतणारे लोक यामुळे कोविडचा संसर्ग पसरण्याची भीती आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेने ‘अर्ली टेस्ट, ट्रिटमेंट अँड डिस्चार्ज’ या त्रिसूत्रीवर भर दिला आहे. मुंबईतील गर्दीची ठिकाणे तसेच दाटीवाटीच्या परिसरातील २६६ लसीकरण केंद्रांवर आरटी-पीसीआर चाचण्या केल्या जात आहेत. बाहेरगावावरून मुंबईत आलेल्या लोकांच्या सर्वेक्षणासाठी स्वयंसेवकांचे पथकही तैनात करण्यात आले आहे.

    मुंबई : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने पालिकेने खबरदारी घेतली आहे. उत्सवांमुळे वाढलेली गर्दी, गावावरून मुंबईत परतणारे लोक यामुळे कोविडचा संसर्ग पसरण्याची भीती आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेने ‘अर्ली टेस्ट, ट्रिटमेंट अँड डिस्चार्ज’ या त्रिसूत्रीवर भर दिला आहे. मुंबईतील गर्दीची ठिकाणे तसेच दाटीवाटीच्या परिसरातील २६६ लसीकरण केंद्रांवर आरटी-पीसीआर चाचण्या केल्या जात आहेत. बाहेरगावावरून मुंबईत आलेल्या लोकांच्या सर्वेक्षणासाठी स्वयंसेवकांचे पथकही तैनात करण्यात आले आहे.

    गणेशोत्सवात मार्केट, गर्दीच्या ठिकाणी झालेली गर्दी, गाठीभेटी तसेच उत्सवासाठी गावावरून परतणारे लोक यांच्यामुळे कोरोना पसरण्याची भिती आहे. पुढे नवरात्री, दसरा, दिवाळी असे गर्दी वाढवणारे सणही लवकरच सुरु होणार आहेत. यावेळी मुंबईतून गावाकडे किंवा परराज्यात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढते. संभाव्य तिस-य़ा लाटेटी भीती अद्याप कायम असल्याने मुंबई महापालिकेने खबरदारी घेतली आहे. कोरोना पसरू नये यासाठी मुंबई महापालिकेने ‘अर्ली टेस्ट, ट्रिटमेंट अँड डिस्चार्ज’वर भर दिला आहे.

    महापालिकेने मुंबईतील गर्दीची ठिकाणे तसेच दाटीवाटीच्या परिसरातील २६६ लसीकरण केंद्रांवर आरटी-पीसीआर चाचण्या करण्यात येत आहेत. बाहेरगावावरून मुंबईत आलेल्या लोकांच्या सर्वेक्षणासाठी स्वयंसेवकांचे पथक तैनात करण्यात आले आहे. शिवाय गृहसंकुलांशी संपर्क करून बाहेरगावावरून आलेल्या लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा लोकांचा शोध घेऊन ‘अर्ली टेस्ट, ट्रिटमेंट अँड डिस्चार्ज’ या त्रिसूत्रीनुसार लक्षणे दिसण्यापूर्वीच चाचण्या केल्या जात आहे.

    बाधित रुग्णाला तत्काळ कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करून उपचार केले जातील. चाचण्या आणि उपचार वेळेत मिळाल्यास रुग्ण लवकर बरा होऊन सुखरूप घरी जाईल. लोकांनी वेळीच चाचणी करून घ्यावी असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.