पालिकेच्या एकमेव क्षय रुग्णालयातील कर्मचारी दिड वर्षांपासून पाैष्टिक आहाराविना !

पालिकेच्या क्षय रुग्णायात एक हजार खाटा असून या रुग्णालयता दरराेज ५० ते ६० बाह्य रुग्ण उपचारासाठी येत असतात. रुग्णालयताील सर्व खाटा रुग्णांनी फुल्ल असतात. गेल्या काही वर्षात मुंबई शहराला क्षयाचा विळखा वाढत असल्याचे दस्तुरखुद्द पािलका आराेग्य विभागाने मान्य केले आहे. या रुग्णालयातील कर्मचारी थेट रुग्णांच्या संपर्कात येत असल्याने कर्मचाऱ्यांना क्षयाचा धाेका अधिक आहे. ज्यामुळे कर्मचाऱ्यांना सकस आहार मिळावा, अशी मागणी मागील दिड वर्षांपूर्वी कर्मचारी संघटनेने आराेग्य विभागाकडे केली हाेती.

  मुंबई: शिवडी येथील पािलकेचे एकमेव क्षय रुग्णालय हे वर्षानुवर्ष समस्यांचे माहेर घरच आहे. पािलकेच्या दप्तरी या रुग्णालयातील समस्या वेळाेवेळी धूळखातच पडलेले असल्याचे चित्र दिसून येत असतं. रुग्णालयातील कर्मचारी थेट रुग्णांच्या संपर्कात येत असल्याने कर्मचाऱ्यांना क्षयाचा धाेका अधिक असताे, पण तरीही येथील कर्मचाऱ्यांना साेयी-सुिवधा पुरविण्याबात पािलका प्रशासन मात्र ताेकडे पडत असल्याची खंत कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मागील दिड वर्षांपासून कर्मचाऱ्यांना सकस आहार मिळावा, याबाबत कर्मचारी वेळाेवेळी प्रशासनाकडे मागणी करत आहेत, पण ढिम्म प्रशासन मात्र याकडे कानाडाेळा करत असल्याचा आराेप कर्मचाऱ्यांनी केला आहे.

  पालिकेच्या क्षय रुग्णायात एक हजार खाटा असून या रुग्णालयता दरराेज ५० ते ६० बाह्य रुग्ण उपचारासाठी येत असतात. रुग्णालयताील सर्व खाटा रुग्णांनी फुल्ल असतात. गेल्या काही वर्षात मुंबई शहराला क्षयाचा विळखा वाढत असल्याचे दस्तुरखुद्द पािलका आराेग्य विभागाने मान्य केले आहे. या रुग्णालयातील कर्मचारी थेट रुग्णांच्या संपर्कात येत असल्याने कर्मचाऱ्यांना क्षयाचा धाेका अधिक आहे. ज्यामुळे कर्मचाऱ्यांना सकस आहार मिळावा, अशी मागणी मागील दिड वर्षांपूर्वी कर्मचारी संघटनेने आराेग्य विभागाकडे केली हाेती. पण अद्यापही सकस आहार मंजूर झाला नसल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. सकस आहार मिळावा, यासाठी कर्मचाऱ्यांनी मागील काही महिन्यांपासून वारंवारं आंदाेलन व निदर्शनेही केली पण तरीही प्रशासन मात्र याकडे कानाडाेळा करत असल्याचा आराेप कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे.

  दरराेज ४० रुपये सकस आहाराची मंजूरी कागदावरच!

  क्षय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना यापूर्वी दरराेज २० रुपये सकस आहाराचे मिळत हाेते. त्यानुसार सकस आहार दिला जात हाेता. कालातरांने महागाई वाढल्याने दरराेज ४० रुपये सकस आहाराचे मंजूर झाले. पण मागील दिड वर्षांपापासून ही मंजूरी अद्यापही कागदावरच आहे. यात पाैष्टिक नाश्ता देण्याचे मंजूर झाले आहे. पण याबाबत काहीही निर्णय हाेत नसल्याचे कर्मचारी सांगतात. मागील वर्षभरापासून काेविडमुळे क्षयाची भीती अधिकच वाढली आहे. पण तरीही प्रशासन मात्र याबाबत मूग गिळून असल्याचे बाेलले जात आहे.

  मागील दिड वर्षांपासून अनेक वेळा आंदाेलन व निदर्शने

  कर्मचाऱ्यांना सकस आहार मिळावा, यासाठी मागील दिड वर्षांपासून बऱ्याच वेळा आंदाेलन व निदर्शने केली जात आहेत पण प्रशासन मात्र याबाबत काहीही निर्णय घेत नाहीये, फक्त ‘‘तारीख पे तारीख ’’ दिली जात आहे. ज्यामुळे कर्मचाऱ्यांमधून नाराजी सूर उमटत अाहे. पण याबाबत संघटनेकडून सातत्याने प्रयत्न केला जाणार आहे.

  रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे मृत्युचे प्रमाण घटतेय !

  शिवडी रुग्णालयातील कर्मचारी थेट रुग्णांच्या संपर्कात येत असल्याने क्षयामुळे संक्रमित हाेण्याचे प्रमाण कर्मचाऱ्यांमध्ये अधिक असते. पण दहा वर्षाच्या तुलनेत क्षयामुळे संक्रमित हाेणे व मृत्यूचे प्रमाण पाहता, गेल्या दाेन वर्षांमधील क्षयबाधित कर्मचाऱ्यांच्या मृत्यूचे प्रमाण घटले असल्याचे समाेर आले आहे. दहा वर्षांपूर्वी वर्षाला ७ ते ८ कर्मचाऱ्यांचा क्षयामुळे मृत्यु झाला असल्याचे आराेग्य विभागाचे म्हणणे आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून मृत्युचा आकडा कमी हाेत असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाकडून उचलण्यात आलेली सकारात्मक पावले रुग्णालयात साेयी सुिवधा, कर्मचाऱ्यांच्या आराेग्याबाबत पाठपुरावा करणे यामुळे मृत्युची संख्या कमी झाली असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. २०२०-२१ मध्ये ३ कर्मचाऱ्यांचा मृत्यु झाला आहे. यात दाेन कर्मचारी काेविड पॉज़िटिव्ह हाेते तर एका कर्मचाऱ्याचा हदयविकाराच्या आजाराने मृत्यु झाला होता.