एन्काउंटर स्पेशालिस्ट वाझेंकडे एनआयए अशी वस्तु सापडली की… रहस्य काही केला उलगडेना

एखाद्या एन्काउंटर स्पेशालिस्टकडे रिव्हॉल्व्हर अथवा काडतुसे असतील तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. तथापि त्याच्याकडे जर हातोडा सापडला असेल तर...? मुंबई पोलिस दलातील वादग्रस्त पोलिस निरीक्षक सचिन वाझेकडे सापडलेल्या एका हातोड्याचे गुपीत शोधण्याचा प्रयत्न एनआयए करीत आहे. वाझे सध्या अंटिलिया जिलेटिन प्रकरण आणि हिरेन मनसुख खून प्रकरणात कोठडीत आहे. एनआयएने त्याच्या वेगवेगळ्या ठिकाणांवरून जे दस्तावेज आणि वस्तू व पुरावे जप्त केले त्यात एक हातोडाही आहे.

  मुंबई : एखाद्या एन्काउंटर स्पेशालिस्टकडे रिव्हॉल्व्हर अथवा काडतुसे असतील तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. तथापि त्याच्याकडे जर हातोडा सापडला असेल तर…? मुंबई पोलिस दलातील वादग्रस्त पोलिस निरीक्षक सचिन वाझेकडे सापडलेल्या एका हातोड्याचे गुपीत शोधण्याचा प्रयत्न एनआयए करीत आहे. वाझे सध्या अंटिलिया जिलेटिन प्रकरण आणि हिरेन मनसुख खून प्रकरणात कोठडीत आहे. एनआयएने त्याच्या वेगवेगळ्या ठिकाणांवरून जे दस्तावेज आणि वस्तू व पुरावे जप्त केले त्यात एक हातोडाही आहे.

  वाझेविरोधात एसीबीच्या (लाचलुचपत प्रतिबंधक) पथकानेही चौकशी सुरू केली आहे. वाझेच्या कार्यालयातून जो हातोडा जप्त करण्यात आला होता त्याचा उपयोग अँटिलिया जिलेटिन प्रकरणाचे पुरावे नष्ट करण्यासाठी केला असावा असा संशय आहे. यासोबतच वाझेकडील डझनभर वाहनेही जप्त करण्यात आली होती. या सर्व वाहनांचे क्रमांकही बदलण्यात आले होते.

  25 फेब्रुवारी रोजी मुकेश अंबानींच्या अँटिलिया इमारतीबाहेर जी स्कॉर्पियो आढळली होती, तिचा क्रमांक वाटेत बदलण्यात आला होता हे सीसीटीव्हीवरून स्पष्ट झाले आहे.

  नंबर प्लेट बदलल्यानंतर नवी नंबर प्लेट लावण्यासाठीच या हातोड्याचा वापर करण्यात आला असावा, असा संशय आहे.
  एनआयए वाझेविरोधात लवकरच आरोपपत्र सादर करणार असून या आरोपपत्रातच या हातोड्याविषयी खळबळजनक माहिती सादर करण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

  हिरेन मनसुखच्या हत्येनंतर या प्रकरणातील काही आरोपी देशाबाहेर पसार झाले झाले होते, असे एनआयएच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणातील दोन आरोपी सतीश मोथुकुरी आणि मनीष सोनी यांचा नव्याने रिमांड मिळविण्यासाठी केलेल्या युक्तिवादादरम्यान एनआयएने याबबतची विस्तृत माहिती न्यायालयाला दिला. न्यायालयाने या दोन्ही आरोपींना 1 जुलैपर्यंत एनआयएची कोठडी सुनावली आहे.

  एनआयएने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सतीशने मनसुखचा गळा घोटला तर ज्या कारमध्ये मनसुखची हत्या झाली ती कार मनीष चालवित होता. त्यानंतर या दोन्ही आरोपींनी मुंबईबाहेर पळ काढला आणि काही दिवसांसाठी देशाबाहेर पलायनही केले. या घटनेनंतर आरोपी कुठे-कुठे गेले याचा शोध एनआयए घेत आहे.