Even if the tweet is deleted, it has reached the destination; Sanjay Raut targets Poonam Mahajan

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंती दिनी भाजपवर जोरदार टीका केली. यानंतर ठाकरे यांच्या या टीकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उत्तर दिले. त्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक व्यंगचित्र ट्वीट करत भाजपला टार्गेट केले. यावरुन भाजपच्या खासदार पुनम महाजन आणि संजय राऊत यांच्यात कलगीतुरा रंगला आहे (Even if the tweet is deleted, it has reached the destination; Sanjay Raut targets Poonam Mahajan).

    मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंती दिनी भाजपवर जोरदार टीका केली. यानंतर ठाकरे यांच्या या टीकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उत्तर दिले. त्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक व्यंगचित्र ट्वीट करत भाजपला टार्गेट केले. यावरुन भाजपच्या खासदार पुनम महाजन आणि संजय राऊत यांच्यात कलगीतुरा रंगला आहे (Even if the tweet is deleted, it has reached the destination; Sanjay Raut targets Poonam Mahajan).

    दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजनयांच्यावरील कार्टुन हे महाजनांवर व्यक्तिगत टीका करणारं नव्हतं. त्या काळात भाजप आणि शिवसेनेची काय ताकद होती हे अधोरेखित करणारं हे ट्विट होतं. भाजप नेत्यांनी केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर ते कार्टुन पोस्ट केलं होतं. हे ट्विट डिलीट केलं असलं तरी जिथे पोहोचायचं तिथे पोहोचलं आहे असं राऊत म्हणाले.

    लोकांनी पोहोचवलं आहे, असं सांगतानाच पूनम महाजन सध्या कुठे आहेत? त्यांचं भाजपशी काय नातं आहे? असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. काल संजय राऊत यांनी ट्विट केलं होतं. त्याला भाजप नेत्या पूनम महाजन यांनी आक्षेप घेत संजय राऊतांवर जोरदार टीका केली होती. या पार्श्वभूमीवर संजय राऊत बोलत होते.

    भाजप खासदार पूनम महाजन यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलंय. “स्वर्गीय बाळासाहेब व स्वर्गीय प्रमोदजी, या दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी युती केली होती. नामर्दांसारखे कार्टुन दाखवू नका”. असं ट्विट करत पूनम महाजन यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे.

    हे सुद्धा वाचा
    • 2022