हिवाळी अधिवेशनाच्या शेवटचा दिवशीही मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीची शक्यता मावळली?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांच्यावर गंभीर शस्त्रक्रिया काही दिवसांपूर्वीच पार पडली. त्यानंतर त्यांना किमान तीन महिने सक्तीने विश्रांती घेण्यास आणि सार्वजनिक कार्यक्रम किंवा सभेला उपस्थितीराहण्यास मनाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री राज्यात फिरू शकत नाहीत त्यामुळे नागपूरात होणारे सत्र मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

  मुंबई  : राज्य विधीमंडळाच्या पाच दिवसांच्या सत्राच सूप वाजले मात्र संपूर्ण अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची उपस्थिती दिसलीच नाही. हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आणि विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होण्याची शक्यता असल्याने मुख्यमंत्री विधानभवनात येण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र ही निवडणूक बारगळल्याने अखेर मुख्यमंत्र्याच्या येण्याची शक्यताही मावळल्याचे शिवसेनेच्या गोटातून सांगण्यात आले.

  मुख्यमंत्री अधिवेशनात अनुउपस्थित राहण्याचा इतिहास
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांच्यावर गंभीर शस्त्रक्रिया काही दिवसांपूर्वीच पार पडली. त्यानंतर त्यांना किमान तीन महिने सक्तीने विश्रांती घेण्यास आणि सार्वजनिक कार्यक्रम किंवा सभेला उपस्थितीराहण्यास मनाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री राज्यात फिरू शकत नाहीत त्यामुळे नागपूरात होणारे सत्र मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र पहिल्या दिवसांपासून मुख्यमंत्री अधिवेशनात उपस्थित राहण्याचा नवा इतिहास नोंदविला गेला आहे.
   
  उपस्थितीची शक्यता मावळला
  मुख्यमंत्री अधिवेशनात कधी येतील? असा प्रश्न सातत्याने विचारला गेला असता, मुख्यमंत्र्यांची तब्येत चांगली असून ते त्यांच्यासोयीनुसार विधानभवनात हजेरी लावतील, असे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले होते. त्यानंतर अधिवेशनाच्या शेवटच्या  दिवशी अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा विषय बारगळल्याने मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीची शक्यता मावळल्याचे सांगण्यात आले.