nilesh rane sanjay raut

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षण प्रश्नी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्यानंतर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी, आम्हाला वाघाशी मैत्री करायला आवडेल, असे वक्तव्य केले होते. भाजपा नेते चंद्रकांत पाटील वाघाशी मैत्री करायला तयार आहेत असे आता म्हणू लागले आहेत़ पण वाघ स्वत: ठरवतो कोणाशी मैत्री करायची ते असा खोचक टोला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपला लगावला. या वक्तव्याचा भाजप नेते निलेश राणे यांनी खरपूस समाचार घेतला.

    मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षण प्रश्नी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्यानंतर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी, आम्हाला वाघाशी मैत्री करायला आवडेल, असे वक्तव्य केले होते. भाजपा नेते चंद्रकांत पाटील वाघाशी मैत्री करायला तयार आहेत असे आता म्हणू लागले आहेत़ पण वाघ स्वत: ठरवतो कोणाशी मैत्री करायची ते असा खोचक टोला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपला लगावला. या वक्तव्याचा भाजप नेते निलेश राणे यांनी खरपूस समाचार घेतला.

    नाक्यावर उभे राहणारे टपोरीही स्वत:ला वाघ समजतात. वाघ बकरी नावाचा चहा सुद्धा येतो आणि टायगर नावाचा बाम सुद्धा येतो. स्वत:ला वाघ म्हटल्यावर वाघ झाले असते, तर जंगलातल्या वाघांची किंमत संपली असती असा टोला नीलेश राणेंनी लगावला.

    हे सुद्धा वाचा