संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ४८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे जुलै २०२२ पर्यंत मुंबईकरांना पाण्याचे टेन्शन नाही, अशी माहिती जलाभियंता विभागाने दिली. भातसा धरणाच्या विद्युत यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने गेल्या काही दिवसांपासून १५ टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. मात्र उकाडा वाढत असताना मुबईच्या काही भागात पाण्याची टंचाई जाणवत आहे(Even though Mumbaikars do not have water tension till July 2022, 15% water cut in Mumbai will continue for a few more days ).

    मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ४८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे जुलै २०२२ पर्यंत मुंबईकरांना पाण्याचे टेन्शन नाही, अशी माहिती जलाभियंता विभागाने दिली. भातसा धरणाच्या विद्युत यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने गेल्या काही दिवसांपासून १५ टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. मात्र उकाडा वाढत असताना मुबईच्या काही भागात पाण्याची टंचाई जाणवत आहे(Even though Mumbaikars do not have water tension till July 2022, 15% Water Cut In Mumbai will continue for a few more days ).

    तलावांमध्ये मुबलक जलसाठा असला तरी मुंबईकर गेले काही दिवस पाणीकपातीचा सामना करीत आहेत. भातसा धरणाच्या विद्युत यंत्रणेत २७ फेब्रुवारीला झालेला बिघाड दुरुस्त होण्यास आणखी काही दिवस लागणार आहेत. त्यामुळे मुंबईतील १५ टक्के पाणीकपात अजून काही दिवस सुरू राहिल अशी माहिती जलाभियंता विभागाने दिली.

    मुंबईला पाणीपुरवठा सातही तलावांमध्ये ४८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे जुलै २०२२ पर्यंत मुंबईकरांना पाण्याचे टेन्शन नाही. राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाच्या मालकीच्या भातसा धरणातील हा बिघाड १५ दिवसांमध्ये दुरुस्ती होण्याचा अंदाज होता. परंतु, या दुरुस्तीला आणखी दोन आठवडे लागण्याची शक्यता असल्याचे जल अभियंता खात्यातील सूत्रांनी सांगितले. मुंबईत आज 37 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत प्रचंड उकाडा वाढला आहे. 15 टक्के पाणी कपात असल्याने मुंबई शहर आणि उपनागराच्या काही भागात पाणी कपातीची तीव्रता जाणवत आहे.

    उंचावर असलेल्या भागांमध्ये किंवा जलवाहिनीच्या शेवटच्या टोकाला असलेल्या परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने होत असतो. अशा भागांमध्ये पुरेसा पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न पालिकेमार्फत सुरू आहे.

    मुंबईला दररोज ३८०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. यापैकी सर्वाधिक दोन हजार दशलक्ष लीटर पाणीपुरवठा भातसा धरणातून केला जातो. सध्या या धरणातून १४०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत आहे.

    मुंबईला पुरेसा पाणी पुरवठा होत आहे, तलावांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. तांत्रिक कामामुळे 15 टक्के पाणी कपात लागू असल्याने नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा, तसेच पाणी जपून वापरावे असे आवाहन माजी महापौर, किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.