लस घेणारे नेमके मुंबईकर किती? लस घेण्यामध्ये मुंबईबाहेरच्या नागरिकांची संख्या अधिक

काही केंद्रांवर प्रत्येकी तिसरा डोस हा नवी मुंबई, डोंबिवली, कर्जत, पनवेल, पालघर आणि वसई-विरारमधील नागरिकांना देण्यात आला आहे, असे पालिकेच्या अनौपचारिक विश्लेषणामध्ये आढळून आल आहे. आकडेवारीवर नजर टाकली तर, शेजारच्या शहरांपेक्षा मुंबईमध्ये जास्त लसीकरण झाले आहे. ठाणे जिल्ह्यात २४.२२ लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. मुंबईत ठाण्याच्या तुलनेत दुप्पट लसीकरण झाले आहे. पालघर जिल्ह्यात फक्त ६ लाखापेक्षा जास्त लसीकरण झाले आहे.

    मुंबई : मुंबईत सध्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहिम सुरु आहे. खासगी सोसाट्यांमध्ये लसीकरण शिबीर आयोजित केली जात आहेत. मुंबईत दररोज जितक्या नागरिकांचे लसीकरण होत आहे. त्यातले २५ टक्के नागरिक हे मूळ मुंबईचे रहिवाशीच नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुंबईत आतापर्यंत ५१ लाख नागरिकांचे लसीकरण झाले असले, तरी लस घेणारे नेमके मुंबईकर किती? किंवा प्रौढांचे लसीकरण पूर्ण व्हायला, अजून किती काळ लागेल, त्याचे चित्र पालिकेसमोर स्पष्ट नाही.

    काही केंद्रांवर प्रत्येकी तिसरा डोस हा नवी मुंबई, डोंबिवली, कर्जत, पनवेल, पालघर आणि वसई-विरारमधील नागरिकांना देण्यात आला आहे, असे पालिकेच्या अनौपचारिक विश्लेषणामध्ये आढळून आल आहे. आकडेवारीवर नजर टाकली तर, शेजारच्या शहरांपेक्षा मुंबईमध्ये जास्त लसीकरण झाले आहे. ठाणे जिल्ह्यात २४.२२ लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. मुंबईत ठाण्याच्या तुलनेत दुप्पट लसीकरण झाले आहे. पालघर जिल्ह्यात फक्त ६ लाखापेक्षा जास्त लसीकरण झाले आहे.

    कोविनमधून रहिवाशी पत्त्याची माहिती मिळत नाही, असे महापालिका अधिकाऱ्याने सांगितले. कोणाचे लसीकरण होतय, यावर आमचे नियंत्रण नाही. कारण कोणीही कुठूनही ऑनलाइन रजिस्ट्रेशन करु शकते, असे अधिकाऱ्याने सांगितले. अनेक लोक एमएमआर क्षेत्रात राहतात. पण नोकरीसाठी मुंबईत येतात. त्यामुळे मुंबईत लसीकरण करण्याची त्यांची मागणी असेल, तर ती चुकीची सुद्धा नाही, असे या अधिकाऱ्याने सांगितले.