प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

केंद्र शासनातर्फे लागू करण्यात आलेल्या नवीन कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी संघटनांनी दिलीसह अन्य राज्यात भव्य आंदोलन उभारले आहे. याचा पुढचा टप्पा म्हणजे संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली आहे; मात्र याचा सर्वाधिक फटका अनेक विद्यापीठांतर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षांना बसला आहे. याचा नाहक मनस्ताप विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. विद्यापीठांनी यावर तोडगा काढत परीक्षांच्या नवीन तारखा जाहीर केल्या आहेत.

मुंबई (Mumbai).  केंद्र शासनातर्फे लागू करण्यात आलेल्या नवीन कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी संघटनांनी दिलीसह अन्य राज्यात भव्य आंदोलन उभारले आहे. याचा पुढचा टप्पा म्हणजे संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली आहे; मात्र याचा सर्वाधिक फटका अनेक विद्यापीठांतर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षांना बसला आहे. याचा नाहक मनस्ताप विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. विद्यापीठांनी यावर तोडगा काढत परीक्षांच्या नवीन तारखा जाहीर केल्या आहेत.

भारत बंदमुळे अनेक राज्यांमधील विद्यापीठाच्या वतीने आज घेण्यात येणाऱ्या परीक्षांवर परिणाम झाला आहे. यात राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचाही समावेश आहे. काही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून, काही परीक्षांच्या सुधारित तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत.

ICAI CA Foundation Examinations Postponement : भारत बंदमुळे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटस् ऑफ इंडिया अर्थात ICAIच्यावतीने घेण्यात येणारी सीए फाऊंडेशन परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. इन्स्टिट्यूटकडून परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्यात आली असून, १३ डिसेंबर रोजी परीक्षा घेतली जाणार आहे.

उस्मानिया विद्यापीठानेही आज होणाऱ्या परीक्षा स्थगित केल्या आहेत. मात्र, ९ डिसेंबर रोजी होणाऱ्या परीक्षा निर्धारित वेळापत्रकानुसार होणार आहेत. आज स्थगित करण्यात आलेल्या परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं विद्यापीठानं म्हटलं आहे. ओडिशा लोक सेवा आयोगातर्फे राज्य सेवा मुख्य परीक्षा ८ डिसेंबर रोजी घेण्यात येणार होती. मात्र, ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. आता ही परीक्षा पुढील वर्षात म्हणजे २ जानेवारी २०२१ रोजी घेतली जाणार आहे.