महाराष्ट्र पोलिस खात्यात खळबळ; एका दिवसात  ८२ अधिकाऱ्यांसह २३१ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियम कडक करण्यात आले आहेत. मात्र कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी धडपडणारे पोलीस मोठ्या संख्येने कोरोनाच्या विळख्यात येत आहेत. गेल्या २४ तासांत ८२ पोलीस अधिकारी आणि २३१ कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात आले आहेत(Excitement in Maharashtra Police Department; Corona 231 police personnel including 82 officers in one day).

    मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियम कडक करण्यात आले आहेत. मात्र कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी धडपडणारे पोलीस मोठ्या संख्येने कोरोनाच्या विळख्यात येत आहेत. गेल्या २४ तासांत ८२ पोलीस अधिकारी आणि २३१ कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात आले आहेत(Excitement in Maharashtra Police Department; Corona 231 police personnel including 82 officers in one day).

    मुंबईसह राज्यात कोरोनाबाधित पोलिसांची संख्या २ हजार ४९७ वर पोहोचली आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि कोरोनाशी आघाडीवर राहण्यासाठी पोलीस लढत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून राज्यात पोलिसांच्या कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. या तीन दिवसांत अनुक्रमे २९८, ३७० आणि ४०३ पोलिसांच्या कोरोनाच्या विळख्यात आले आहेत. तर कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या ९ हजार ५१८ पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

    त्याचप्रमाणे राज्य पोलीस दलात गेल्या सात दिवसांत ४३९ अधिकारी आणि १६६५ कर्मचाऱ्यांसह २१०४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात कोरोनाच्या तीन लाटेमध्ये आतापर्यंत ४८,९७१ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये ६ हजार २७८ पोलीस अधिकारी आणि ४२ हजार ६९३ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राज्यात आतापर्यंत ४५ हजार ९७० पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे.

    हे सुद्धा वाचा
    • 2022