Another case has been registered against Akash Jadhav, accused in the much talked about Shaktimil case, at the Mumbai police station

शक्ती मिल बलात्कारसह बेलापूर सामुहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींची फाशीची शिक्षाही गुरूवारी मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आली आहे. घटनेवेळी अल्पवयीन असल्याचे आरोपींनी दाखल्यानिशी सिद्ध केले. फाशी रद्द झाली असली तरी जन्मठेप कायम आहे (Execution of accused in Belapur rape and murder case canceled; Proved to be a minor).

    मुंबई : शक्ती मिल बलात्कारसह बेलापूर सामुहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींची फाशीची शिक्षाही गुरूवारी मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आली आहे. घटनेवेळी अल्पवयीन असल्याचे आरोपींनी दाखल्यानिशी सिद्ध केले. फाशी रद्द झाली असली तरी जन्मठेप कायम आहे (Execution of accused in Belapur rape and murder case canceled; Proved to be a minor).

    नवी मुंबईतील बेलापूरमध्ये बाबू आणि त्याचा साथीदार समाधान शिरसाट उर्फ रघू रोकडा हे दोघेही कॅटरींग कंपनीत आचारी म्हणून काम करत होते. त्यांना दारूचे व्यसन जडले होते. ९ मे २०१२ रोजी रात्रीच्या सुमारास सीबीडी बेलापूर पुलाखाली दोन कचरा वेचण्याचे काम करणाऱ्या मुलींशी त्यांची ओळख झाली. कॅटरींग व्यावसायात नोकरीचे अमिष दाखवून त्यांनी या दोघींशी मैत्री केली. त्यानंतर पुलाखाली बसून चौघांनी एकत्र बसून मद्यपान केले. त्यानंतर पुला खाली नेऊन तिथे दोघींवर बलात्कार केला आणि त्यानंतर चाकून भोसकून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला.

    ज्यात २६ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला मात्र, २० वर्षीय दुसरी मुलगी जीव वाचवून निसटली आणि तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. दोन्ही आरोपांचा शोध घेऊन नवी मुंबई पोलिसांनी अटक केली. त्यानंतर ११ मे २०१७ मध्ये सत्र न्यायालयाने त्यांना दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली. त्यास दोघांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. तेव्हा, दुसऱ्या आरोपीने घटनेवेळी आपण अल्पवयीन असल्याचे दाखल्यानिशी सिद्ध केले. त्यामुळे २०१९ मध्ये न्यायालयाने अल्पवयीन आरोपीची फाशी २०१९ मध्ये रद्द केली होती.

    ऑगस्ट २०१३ मध्ये मुंबईत महिला फोटोग्राफरवर गँगरेप झाला होता. मुंबई सत्र न्यायालयाने २०१४ मध्ये सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आरोपींनी हायकोर्टात आव्हान दिले होते. मुंबई उच्च न्यायालयाने हे आव्हान फेटाळून लावल्यानंतर आज अंतिम निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने तिन्ही आरोपी विजय जाधव, मोहम्मद बेंगाली, मोहम्मद अंसारी यांची फाशीची शिक्षा रद्द करून आजन्म कारावासाची शिक्षा न्या. साधना जाधव आणि न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने सुनावली आहे.