
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत पहाटे शपथ घेण्याच्या निर्णयाबाबत पश्चात्ताप व्यक्त केला आहे. महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष झाल्याच्या निमित्ताने एका मुलाखतीत त्यांनी याबाबत व्यक्त केली. शिवसेनेने विश्वासघात केल्यानंतर जशास तसे उत्तर देण्यासाठी आम्ही अजित पवारांसोबत मिळून सरकार स्थापन केले होते. कारण आमच्या पाठीत खंजीर खुपसण्यात आला होता, असे फडणवीस म्हणाले(Fadnavis breaks silence on swearing in with Ajit Pawar ).
मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत पहाटे शपथ घेण्याच्या निर्णयाबाबत पश्चात्ताप व्यक्त केला आहे. महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष झाल्याच्या निमित्ताने एका मुलाखतीत त्यांनी याबाबत व्यक्त केली. शिवसेनेने विश्वासघात केल्यानंतर जशास तसे उत्तर देण्यासाठी आम्ही अजित पवारांसोबत मिळून सरकार स्थापन केले होते. कारण आमच्या पाठीत खंजीर खुपसण्यात आला होता, असे फडणवीस म्हणाले(Fadnavis breaks silence on swearing in with Ajit Pawar ).
आम्ही जशास तसे उत्तर देण्याचा विचार केला याचा मला पश्चात्ताप आहे. हे झाले नसते तर चांगले झाले असते, असे वाटते. मला माहिती आहे त्यावेळी काय झाले होते आणि कोणी काय केले होते. यासंदर्भात एक पुस्तक लिहिणार असून त्यामध्ये या सर्व घटना उघड करणार आहे. सरकार जेवढे स्थिर दिसते, तितकेच ते कोसळण्याची शक्यता अधिक असते. हे सरकार आपल्याच वजनाने खाली येईल असे फडणवीस म्हणाले.
या कबुलीजबाबावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी फडणवीसांना खोचक टोला लगावला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये मलिक यांनी फडणवीसांच्या या विधानाचा समाचार घेताना, चिडिया चुग गई खेत, अब पछताए का होय, अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली.
त्यांना सत्तेशिवाय राहाताच येत नाही, दोन वर्षांपूर्वी त्यांनी हे सिद्ध करून दाखवले. ते सांगत राहिले की अजून वाटत नाही की मी मुख्यमंत्री नाही. बहुतेक दोन वर्षांनंतर खरी परिस्धिती त्यांनी स्वीकारली आहे. त्यांचा सात वर्षांपूर्वीचा व्हीडिओ होता, ज्यात ते म्हणाले होते माझे लग्न कधीही होणार नाही, मी करणार नाही. पण हे ते विसरून गेले. म्हणजे सत्तेवर येण्यासाठी ते काहीही करू शकतात, काहीही बोलू शकतात, अशी टीका मलिक यांनी केली.