Vaccination
Vaccination

कोरोना प्रतिबंधक लसीच्याऐवजी मिठाचे पाणी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती तपासातून पुढे येत असल्याचे सांगितले जात आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत बोलताना म्हटले आहे की, बनावट लसीकरण केलेल्या सर्वांची अँटीबॉडी टेस्ट केली जाईल. तसेच या नागरिकांना कोव्हिशिल्ड लसीचे डोस देण्यात येतील.

    मुंबई: मुंबईतील बनावट लसीकरणाच्या प्रकरणाने राज्यसह देशभरात खळबळ उडवून दिली. बनावट कोरोना लसीकरणाप्रकरणी आतापर्यंत १० जणांना अटक करण्यात आली असून, या प्रकरणातील तपासात अनेक धक्कादायक खुलासे झाले असल्याचे सांगितले जात आहे. या बनावट लसीकरणात नागरिकांना चक्क मिठाचे पाणी दिले गेल्याचे समोर आले आहे.

    कोरोना प्रतिबंधक लसीच्याऐवजी मिठाचे पाणी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती तपासातून पुढे येत असल्याचे सांगितले जात आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत बोलताना म्हटले आहे की, बनावट लसीकरण केलेल्या सर्वांची अँटीबॉडी टेस्ट केली जाईल. तसेच या नागरिकांना कोव्हिशिल्ड लसीचे डोस देण्यात येतील.

    बनावट लसीकरणादरम्यान एका केंद्रात ३९० जणांना १२६० रुपये दर आकारून लस देण्यात आली. मात्र, त्यासंदर्भात कोणतीही माहिती कोविन अॅपवर अद्ययावत केली गेली नाही. बनावट लसीकरण प्रकरणात आतापर्यंत सुमारे २०४० लोकांची फसवणूक झाल्याचे समोर येत आहे.