प्रसिद्ध पत्रकार कमाल खान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, यूपीतील राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

ग्रांऊड पातळीवर जाऊन वृत्ताकंन करणारे उत्तर प्रदेशातील व एका प्रसिद्ध हिंदी वृत्तवाहिनीचे ज्येषेठ पत्रकार कमाल खान यांचे निधन झाले आहे. उत्तर प्रदेशातील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कमाल खान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी कमाल खान यांना मृत घोषित केले.

    लखनऊ : देशात एकिकडे कोरोनाने लोकांचे जीव जात असताना, आणि त्या कोरोनाच्या बिकट परिस्थितीचे ग्रांऊड पातळीवर जाऊन वृत्ताकंन करणारे उत्तर प्रदेशातील व एका प्रसिद्ध हिंदी वृत्तवाहिनीचे ज्येषेठ पत्रकार कमाल खान यांचे निधन झाले आहे. उत्तर प्रदेशातील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कमाल खान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी कमाल खान यांना मृत घोषित केले.

    पत्रकारितेत अनेक वर्षापासून कमाल खान काम करत होते, ज्येष्ठ पत्रकार कमाल खान यांचा विवाह पत्रकार रुचि कुमारसोबत झाला होता. बटलर पॅलेस, लखनऊ येथे असलेल्या सरकारी बंगल्यात ते कुटुंबासह राहत होते. तेथे शुक्रवारी 14 जानेवारीला पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सध्या कमाल खान हे एका वृत्तवाहिनीचे संपादक म्हणून काम करत होते. त्यांनी अनेक महत्त्वाचे ग्रांऊड झिरो बातम्या केल्या होत्या, समाजातील तळागळातील माणसांना न्याय मिळवून दिला होता. त्यांच्या या योगदानाबद्दल कमाल खान यांचा रामनाथ गोएंका पुरस्कार देऊन, सन्मानित केले. याशिवाय त्यांना भारताच्या राष्ट्रपतींकडून गणेश शंकर विद्यार्थी पुरस्कारही मिळाला आहे.

    कमाल खान यांनी दीर्घकाळ टीव्ही पत्रकारितेत काम केले असून, त्यांच्या बातमी सादर करण्याच्या अनोख्या शैलीचे देशभरात कौतुक होते. जेष्ठ पत्रकार कमाल खान यांच्या निधनानंतर सोशल मिडियावर विविध स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. तर उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे, तर अनेक मान्यवरांनी कमाल खान यांच्या प्रती सहवेदना व्यक्त केला आहेत.