Farmers will get cotton money on time; Government guarantee for loans of Cotton Marketing Federation

महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाद्वारे हंगाम २०२०-२१ मध्ये किमान आधारभूत दराने कापूस खरेदी करण्यात आली होती. या कापसाचे चुकारे शेतकऱ्यांना वेळेत अदा करण्यासाठी कापूस पणन महासंघाने युको बँकेकडून ६ टक्के व्याजदराने सहाशे कोटींचे कर्ज घेतले होते. या कर्जास शासन हमी  देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. 

    मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाद्वारे हंगाम २०२०-२१ मध्ये किमान आधारभूत दराने कापूस खरेदी करण्यात आली होती. या कापसाचे चुकारे शेतकऱ्यांना वेळेत अदा करण्यासाठी कापूस पणन महासंघाने युको बँकेकडून ६ टक्के व्याजदराने सहाशे कोटींचे कर्ज घेतले होते. या कर्जास शासन हमी  देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

    या बरोबरच सहाशे कोटी शासन हमीवर कापूस पणन महासंघास राज्य शासनास अदा करावे लागणारे हमीशुल्क माफ करण्यास देखील आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.