Bhandup Hospital Fire (Live) | भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये भीषण आग, मृतांचा आकडा वाढला ; आगीत १० जणांचा मृत्यू | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रेकिंग न्यूज़
लाईव्ह ब्लॉग
अंतिम अपडेट1 year ago

भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये भीषण आग, मृतांचा आकडा वाढला ; आगीत १० जणांचा मृत्यू

ऑटो अपडेट
द्वारा- Mayur Sawant
कंटेन्ट रायटर
15:14 PMMar 26, 2021

सनराईज हॉस्पिटलवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली आहे काय? अतुल भातखळकर यांचा सवाल

भांडुपच्या ड्रीम मॉल मधील सनराइज कोविड सेंटरला लागलेल्या आग प्रकरणी तेथे अनधिकृतपणे कोविड सेंटर उभे राहते. याची साधी माहिती सुद्धा महानगरपालिकेला नसल्याचे स्वतः महापौर कबूल करतात, या ड्रीम मॉलमध्ये पीएमसी बँक घोटाळ्याचे सूत्रधार असलेल्या वाधवान बंधूंच्या नातेवाईकांची गुंतवणूक असल्यामुळेच शिवसेनेने या मॉलवर व अनधिकृतपणे उभे राहिलेल्या या सनराईज हॉस्पिटलवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली आहे काय? असा सवाल भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे.

15:09 PMMar 26, 2021

मुंबई महापालिकेचे प्रशासन भ्रष्ट्राचारी झाले आहेत : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

जे अनधिकृत रूग्णालय आणि इमारती आहेत. त्याच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. मुंबई महापालिकेचे प्रशासन इतके भ्रष्ट्राचारी झाले आहेत की, त्यांच्याकडून कार्यवाही होईल की नाही. यामध्येच शंका उपस्थित होत आहे. असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. पुढे म्हणाले की, उच्च न्यायालयाने स्वत: या प्रकरणात दखल घेतली पाहीजे, असं मला वाटतं.

14:06 PMMar 26, 2021

राज्यात इतर इमारतींमध्ये असलेल्या कोविड रुग्णालयांची अग्निसुरक्षा तपासा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये लागलेल्या आगीमुळे सनराईज रुग्णालयातील रुग्णांच्या झालेल्या मृत्यूंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन त्यांनी पाहणीही केली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली. त्याचप्रमाणे अशा रीतीने राज्यभरात ज्या मॉल्स किंवा इतर वास्तूंमध्ये कोविड रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालये सुरु आहेत. त्या ठिकाणच्या अग्नीसुरक्षेची तपासणी तात्काळ करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

ही घटना दुर्दैवी असल्याचे सांगून ते म्हणाले की, यासंदर्भात ज्यांनी दुर्लक्ष व दिरंगाई केली अशा सर्व जबाबदार लोकांवर कठोर कारवाई करण्यात येईल. वाढत्या कोविड संसर्गामुळे विविध इमारती किंवा वास्तूंमध्ये तात्पुरत्या स्वरूपात अशा प्रकारच्या फिल्ड रुग्णालयांना परवानग्या देण्यात आल्या आहेत. आजच्या आगग्रस्त रुग्णालयास देखील  तात्पुरती परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वीच मी भंडारा येथे जिल्हा रुग्णालय आगीनंतर राज्यातील सर्व रुग्णालयांच्या अग्नी सुरक्षेची तपासणी करून घेण्याचे निर्देश दिले होते. त्याचप्रमाणे कोविड उपचारासाठी उभारण्यात आलेल्या राज्यातील सर्व फिल्ड रुग्णालये व  इमारतींमधील रुग्णालयांच्या अग्नी सुरक्षेची खातरजमा करून घेण्यात यावी असे निर्देश मी देत आहे. मुख्यमंत्र्यानी पालिका आयुक्त व महापौर यांच्याशी देखील ही दुर्घटना कळताच चर्चा केली. जखमी तसेच इतर कोविड रुग्णांना इतरत्र व्यवस्थित उपचार मिळतील हे पाहण्यास सांगितले.

13:52 PMMar 26, 2021

सनराईज रुग्णालयात लागलेल्या आगीत दहा जणांचा मृत्यू ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मृतांच्या कुटुंबीयांची मागितली माफी

भांडूपच्या ड्रिम मॉलमधील सनराईज रुग्णालयात लागलेल्या आगीत दहा जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मृतांच्या कुटुंबीयांची माफी मागितली आहे. तसेच या घटनेची चौकशी करण्यात येणार असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भांडूपमध्ये येऊन घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधत या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

13:43 PMMar 26, 2021

या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट

भांडुपमध्ये झालेल्या ड्रीम मॉलमधील धक्कादायक घटनेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त करत एक ट्विट केलं आहे. ज्या कुटुंबियांनी आपल्या प्रियजणांना आणि कुटुंबातील व्यक्तींना गमावलं आहे. त्याबाबत फडणवीसांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच जखमी झालेले रूग्ण लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी मी प्रार्थना करतो. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, असं फडणवीसांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितलं आहे.

12:37 PMMar 26, 2021

हॉस्पिटल प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करणार: हेमंत नगराळे

भांडूपच्या ड्रिम मॉलमधील सनराईज रुग्णालयाला निष्काळजीपणातूनच आग लागली असून या प्रकरणी हॉस्पिटल प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली.

सनराईज हॉस्पिटलला लागलेली आग ही अत्यंत भीषण आहे. निष्काळजीपणातून ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी हॉस्पिटल प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच आगीला रुग्णालयातील कोण कोण जबाबदार आहेत, त्याचा तपास करण्यात येणार असून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं नगराळे यांनी सांगितलं.

12:21 PMMar 26, 2021

कोरोनाच्या काळात पैसे उकळण्यासाठी या रुग्णालयाला परवानगी दिली होती का ? : संदीप देशपांडे

कोरोनाच्या काळात पैसे उकळण्यासाठी या रुग्णालयाला परवानगी दिली होती का, असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी विचारला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांना निलंबित केले पाहिजे. प्रशासन फक्त नावाला चौकशी करते, पुढे काहीच येत नाही, अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली आहे.

12:21 PMMar 26, 2021

मॉलच्या रुग्णालयाला OC आणि अग्निशामन यंत्रणा नव्हती : भाजप नेते किरीट सोमय्या

भांडुपच्या ड्रीम्स मॉलमधील सनराईझ या रुग्णालयात लागलेल्या आगीच्या घटनेवरून भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiaya) यांनी पालिका प्रशासनाला लक्ष्य केले आहे. आग लागलेल्या सनराईझ रुग्णालयाला भोगवटा प्रमाणपत्र (OC) मिळाले नव्हते. तसेच रुग्णालयात कोणतीही अग्निशमन यंत्रणा नव्हती. मात्र, पालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी घटनास्थळी येऊन पाहणी केली. यावेळी किरीट सोमय्या यांनी पालिका प्रशासनाला लक्ष्य केले. काही दिवसांपूर्वी झालेल्या सर्वेक्षणात ड्रीम्स मॉलमध्ये अग्निशमन यंत्रणा नसल्याचे समोर आले होते. हा मॉल HDIL कंपनीने बांधला आहे. या मॉलमध्ये १०५६ दुकाने आहेत, त्यापैकी ५०० ते ६०० दुकाने अजूनही सुरु असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले.

 

आज (शुक्रवार) दुपारी ३ वाजता परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विरोधात लोकायुक्तांसह भाजप नेते किरीट सोमय्या याचिका दाखल करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसेच भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये असलेल्या सनराईज कोव्हिड रुग्णालयाविरोधात भांडुप पोलीस स्टेशनमध्ये किरीट सोमय्या यांनी तक्रार दाखल केल्याचं ट्विट त्यांनी केलं आहे. भांडुप ड्रीम मॉलला लागलेली आग, १० कोविड रुग्णांचा मृत्यू आणि सनराईज रूग्णालयाविरोधात सोमय्यांनी तक्रार दाखल केली आहे.

12:20 PMMar 26, 2021

मॉलच्या रुग्णालयाला OC आणि अग्निशामन यंत्रणा नव्हती : भाजप नेते किरीट सोमय्या

भांडुपच्या ड्रीम्स मॉलमधील सनराईझ या रुग्णालयात लागलेल्या आगीच्या घटनेवरून भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiaya) यांनी पालिका प्रशासनाला लक्ष्य केले आहे. आग लागलेल्या सनराईझ रुग्णालयाला भोगवटा प्रमाणपत्र (OC) मिळाले नव्हते. तसेच रुग्णालयात कोणतीही अग्निशमन यंत्रणा नव्हती. मात्र, पालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी घटनास्थळी येऊन पाहणी केली. यावेळी किरीट सोमय्या यांनी पालिका प्रशासनाला लक्ष्य केले. काही दिवसांपूर्वी झालेल्या सर्वेक्षणात ड्रीम्स मॉलमध्ये अग्निशमन यंत्रणा नसल्याचे समोर आले होते. हा मॉल HDIL कंपनीने बांधला आहे. या मॉलमध्ये १०५६ दुकाने आहेत, त्यापैकी ५०० ते ६०० दुकाने अजूनही सुरु असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले.

 

आज (शुक्रवार) दुपारी ३ वाजता परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विरोधात लोकायुक्तांसह भाजप नेते किरीट सोमय्या याचिका दाखल करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसेच भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये असलेल्या सनराईज कोव्हिड रुग्णालयाविरोधात भांडुप पोलीस स्टेशनमध्ये किरीट सोमय्या यांनी तक्रार दाखल केल्याचं ट्विट त्यांनी केलं आहे. भांडुप ड्रीम मॉलला लागलेली आग, १० कोविड रुग्णांचा मृत्यू आणि सनराईज रूग्णालयाविरोधात सोमय्यांनी तक्रार दाखल केली आहे.

11:25 AMMar 26, 2021

मृतांचा आकडा वाढला ; आगीत १० जणांचा मृत्यू

बीएमसीने ६ जणांच्या मृत्यूबाबत माहिती दिल्यानंतर आता आणखी ४ जणांचे मृतदेह सापडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता मृतांचा आकडा वाढून १० पर्यंत पोेहोचला आहे. तसेच या घटनेमुळे येथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्याचप्रमाणे मृतांचा आकडा आणखी वाढेल का अशी भीती निर्माण होत आहे.

Load More

मुंबई : भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये काल रात्री (गुरूवार) १२ वाजताच्या दरम्यान भीषण आग लागली. या मॉलमध्ये सनराईज हे कोव्हिड रुग्णालय आहे. परंतु या आगीत कोव्हिड रुग्णालयातील दोन जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या आगीत मृताच्या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आगीच्या या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २३ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. महापौर किशोरी पेडणेकर, अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश ककाणी हे देखील घटनास्थळी दाखल झाले. तसेच बचाव कार्य गेल्या सहा तासांपासून सुरु आहे. ही आग प्रथमतः पहिल्या मजल्यावर लागली आणि ती वाढत जाऊन वरच्या रुग्णालयापर्यंत पोहचली.

रुग्णालयात आग लागली तेव्हा ७६ रुग्ण होते. त्यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन शिड्यांच्या मदतीने खाली काढले. मात्र नंतर ही आग प्रचंड वाढली असून अजून ही त्यात काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सनराईज रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, जे दोन रुग्ण दगावले ते आगीमुळे दगावले नाही. त्यांचा मृत्यू आगीमुळे झालेला नाही, आधीच कोव्हिड उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांचे फॉर्मलिटीज काम बाकी होते त्यामुळे शव रुग्णालयात होते. आग लागली तेंव्हा आलर्म वाजल्यानंतर ताबडतोब सर्व लाइट्स कनेक्शन बंद केले आणि रुग्णांना बाहेर काढण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

Advertisement
OK

We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.