रेड्डीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला सह आरोपी करा : भाजप नेत्या चित्रा वाघ यांची मागणी

दिपाली चव्हाण प्रकरणात लढाई अजून संपलेली नाही. रेड्डीचे निलंबन झाले मात्र दिपालीला आत्महत्येला प्रवृत्त करण्यास शिवकुमार इतकाच जबाबदार रेड्डी जबाबदार असल्याने सहआरोपी करत त्याच्यावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा हि आमची मागणी आज ही कायम आहे

    मुंबई: भारतीय जनता पक्षांच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आयते श्रेय न घेता रेड्डीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला सह आरोपी करण्याचे आदेश द्यावे असे आव्हान दिले आहे. आज मुख्यमंत्र्यांना भेटून पालकमंत्र्यानी रेड्डीच्या निलंबनाची मागणी केली मात्र ही मागणी गेल्या चार दिवसांपासून भाजपने लावून धरली होती असे वाघ म्हणाल्या.

    ‪ तर दिपाली आपल्यामध्ये असती
    चित्रा वाघ माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, हा न्याय ती जिवंत असतांना मिळाला असता तर कदाचित आज दिपाली आपल्यामध्ये असती. तिच्या जाण्याने RFO विशेषत: मेळघाटात काम करणा-यांच्या व्यथा समोर आल्या पण त्यासाठी दिपालीला गमवावे लागले असे त्यांनी म्हटले आहे.  त्या म्हणाल्या की, दिपाली चव्हाण प्रकरणात लढाई अजून संपलेली नाही. रेड्डीचे निलंबन झाले मात्र दिपालीला आत्महत्येला प्रवृत्त करण्यास शिवकुमार इतकाच जबाबदार रेड्डी जबाबदार असल्याने सहआरोपी करत त्याच्यावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा हि आमची मागणी आज ही कायम आहे असे चित्रा वाघ म्हणाल्या.