अखेर राज्य सरकारने २४ जिल्हयात निर्बध केले शिथील; प्रार्थना स्थळे, सामाजिक राजकीय मेळावे आणि गर्दी करण्यास मनाई कायम!

कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सोलापूर, अहमदनगर, बीड, रायगड, आणि पालघर हे  अकरा जिल्हे वगळून अन्य कोरोनाचा प्रभाव कमी झालेल्या जिल्ह्यात दैनंदिन व्यवहार सुरू करण्यात येत आहेत. त्यात अत्यावश्यक आणि अन्य सर्व प्रकारच्या दुकांनाच्या वेळा सायंकाळी ८ वाजे पर्यत वाढवून देण्यात आल्या आहेत. या शिवाय शनिवारी देखील दुपारी ३ वाजे पर्यंत दुकाने सुरू ठेवता येतील.

    मुंबई : बहुप्रतिक्षित ब्रेक द चेन च्या निर्बंध शिथीलीकरणाचा आदेश मुख्य सचिव सिताराम कुंटे यानी सायंकाळी अखेर निर्गमीत केला आहे. या आदेशानुसार राज्यात कोरोनाचा प्रभाव असलेल्या अकरा जिल्ह्याना वगळून उर्वरीत २४ जिल्ह्यात दुकानांच्या वेळा सायंकाळी आठ वाजे पर्यंत वाढवून देण्यात आल्या आहेत. या शिवाय शनिवारी देखील सकाळी आठ ते सायंकाळी ३ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवता येणार आहेत.

    अकरा जिल्ह्यात धोका कायम

    या आदेशात म्हटले आहे की, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सोलापूर, अहमदनगर, बीड, रायगड, आणि पालघर हे  अकरा जिल्हे वगळून अन्य कोरोनाचा प्रभाव कमी झालेल्या जिल्ह्यात दैनंदिन व्यवहार सुरू करण्यात येत आहेत. त्यात अत्यावश्यक आणि अन्य सर्व प्रकारच्या दुकांनाच्या वेळा सायंकाळी ८ वाजे पर्यत वाढवून देण्यात आल्या आहेत. या शिवाय शनिवारी देखील दुपारी ३ वाजे पर्यंत दुकाने सुरू ठेवता येतील.

    शक्यतो वर्क फ्रॉम होमला प्राधान्य

    या शिवाय हॉटेल आणि रेस्टॉरेंट, जिम, केश कर्तनालये स्पा, ब्युटी पार्लर, यांना वातानुकूल यंत्रणा सुरू न करता ५० टक्के क्षमतेने व्यवहार सुरू करता येणार आहेत. सर्व खेळाची मैदाने बगिचे, उद्याने, सुरू करण्यास मुभा देण्यात आली आहे. सर्व शासकीय कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू राहतील. या शिवाय खाजगी कार्यालये देखील पूर्ण क्षमतेने गर्दी टाळून सुरू ठेवण्यासाठी वेळांचे नियोजन करण्यात यावे असे या आदेशात म्हटले आहे. या मध्ये शक्यतो वर्क फ्रॉम होम या पध्दतीने सुरू करता येतील.

    प्रार्थनास्थळे उघडण्यास मनाई

    या आदेशात अद्याप प्रार्थनास्थळे उघडण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच शाळा आणि महाविद्यालयांबाबत शिक्षण विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार कार्यवाही केली जाणार आहे. रात्री ९ ते पहाटे पाच वाजेपर्यंत नागरीकांच्या मुक्त संचाराला मनाई कायम राहणार आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळणे, मेळावे, सण उत्सव, राजकीय सामाजिक कार्यक्रमांना मनाई कायम राहणार आहे. मास्क वापरणे, हात धुणे आणि अन्य नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे असे या आदेशात म्हटले आहे.