सीबीआय टीमची होणार कोरोना का कोरोना चाचणी, मुंबई महापालिकेने दिले उत्तर, जाणून घ्या

सुशांत प्रकरणी तपास करत असणाऱ्या मुंबई पोलिसांच्या टीममधील आयपीएस अधिकारी अभिषेक त्रिमुखे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. अभिषेक त्रिमुखे हे वारंवार दिल्लीवरुन आलेल्या सीबीआय टीमच्या संपर्कात होते. तसेच या प्रकरणाचा तपास त्यांनी सीबीआयला सोपवला आहे.

मुंबई : सुशांत सिंग (Sushant Singh Rajput) राजपूतची हत्या केली की आत्महत्या या प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. परंतु तपासाला गती मिळाली असतानाच प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या टीममधील एका आयपीएस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सीबीआयच्या टीमचीही कोरोना चाचणी (corona test) होणार का याबाबत खळबळ माजली आहे. परंतु याबाबत कोरोना चाचणी करायची की नाही याचा सर्वस्वी निर्णय सीबीआय टीमला (CBI team) घ्यायचा आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेने (Mumbai Municipal Corporation) यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे.

सुशांत प्रकरणी तपास करत असणाऱ्या मुंबई पोलिसांच्या टीममधील आयपीएस अधिकारी अभिषेक त्रिमुखे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. अभिषेक त्रिमुखे हे वारंवार दिल्लीवरुन आलेल्या सीबीआय टीमच्या संपर्कात होते. तसेच या प्रकरणाचा तपास त्यांनी सीबीआयला सोपवला आहे. सीबीआय टीमही अभिषेक त्रिमुखेंच्या वारंवार संपर्कात आली आहे. त्यामुळे सीबीआय टीमची कोरोना चाचणी होणार का याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.

सीबीआय टीमची कोरोना चाचणी होणार का याबाबत मुंबई महानगरपालिकेला विचारणा केल्यास महापालिकेने म्हटले आहे की, कोरोनाची चाचणी करायची की नाही, याबाबत सीबीआयने स्वतः निर्णय घ्यावा. आमचे याबाबत कोणतेही म्हणणे नाही, त्यांना गरजेचे वाटल्यास त्यांनी कोरोना चाचणी करावी नाहीतर करु नये. तो सर्वस्वी त्यांचा निर्णय असेल. असे वक्तव्य मुंबई महानगरपालिकेच्या मोठ्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.