कांदिवली पश्चिम एकता नगर येथील म्हाडाची जुनी इमारत क्रं १० मधील इलेक्ट्रिक मीटर बॉक्सला आज सकाळी भीषण आग लागली. आग लागताच काही वेळातच धुराचे लोट संपूर्ण इमारतीत पसरल्याने रहिवाशांनी गच्चीवर धाव घेतली. मुंबई अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच जवानांनी घटनास्थळी धाव घेत गच्चीवर अडकलेल्या ६० जणांपैकी ३३ जणांची सुखरुप सुटका केली(Fire at meter box in old MHADA building in Kandivali; 27 injured).तर २७ जणांना धुराचा त्रास झाल्याने २२ जणांना शताब्दी रूग्णालयात दाखल करण्यात आले.

    मुंबई : कांदिवली पश्चिम एकता नगर येथील म्हाडाची जुनी इमारत क्रं १० मधील इलेक्ट्रिक मीटर बॉक्सला आज सकाळी भीषण आग लागली. आग लागताच काही वेळातच धुराचे लोट संपूर्ण इमारतीत पसरल्याने रहिवाशांनी गच्चीवर धाव घेतली. मुंबई अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच जवानांनी घटनास्थळी धाव घेत गच्चीवर अडकलेल्या ६० जणांपैकी ३३ जणांची सुखरुप सुटका केली(Fire at meter box in old MHADA building in Kandivali; 27 injured).तर २७ जणांना धुराचा त्रास झाल्याने २२ जणांना शताब्दी रूग्णालयात दाखल करण्यात आले.

    त्यातील ९जण आयसीयूमध्ये असून १३ जण जनरल वॉर्ड मध्ये उपचार घेत आहेत.तर खाजगीआॅस्कर हॉस्पिटलमध्ये ५ जण दाखल करण्यात आले आहेत.या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉकटरांनी सांगितले.

    कांदिवली पश्चिम येथील जनकल्याण नगर, एकता नगर जवळील तळ अधिक ७ मजली म्हाडाच्या १० क्रं इमारतीतील मीटर बॉक्सला मंगळवारी सकाळी १०.३० च्या सुमारास आग लागली. काही वेळातच धुराचे लोट संपूर्ण इमारतीत पसरले. आग लागल्याचे कळताच इमारतीत रहिवाशांनी गच्चीवर धाव घेतली. मात्र गच्चीवरुन खाली येण्याचा मार्ग बंद झाल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

    दरम्यान, आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमक दलाने घटनास्थळी धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळवण्याबरोबर गच्चीवर अडकलेल्यांना वाचण्याचे प्रयत्न केले. अखेर शिडीच्या मदतीने गच्चीवर अडकलेल्या ६० जणापैकी ३३ जणांना सुखरुप खाली उतरवण्यात आले. धुरामुळे २७ रहिवाशांना त्रास होऊ लागला त्यातील २२ जणांना कांदिवलीच्या शताब्दी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून ९जण आयसीयूमध्ये आहेत.

    तर १३जण जनरल वॉर्डमध्ये उपचार घेत आहेत.अन्य ५ जणांना आॅस्कर या खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे वैदयकीय अधिकाऱ्याने सांगितले.पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.