राज्य सरकार सूडबुद्धीने वागत आहे चंद्रकांत पाटलांची राज्य सरकारवर टीका

हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा आणि पाचवा दिवस आहे, त्यामुळे सभागृहात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी होताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान त्याआधी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका. राज्य सरकार सूडबुद्धीने कारवाई करत आहे असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

    मुंबई : हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा आणि पाचवा दिवस आहे, त्यामुळे सभागृहात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी होताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान त्याआधी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका. राज्य सरकार सूडबुद्धीने कारवाई करत आहे असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

    राज्यपाल आणि महाविकास आघाडीत संघर्ष आहे, यावर बोलायला मी काय दोघांचाही प्रवक्ता नाही असं सुद्धा पाटील म्हणाले. तसेच कार्यक्रम पत्रिकेत निवडणुकीचा कार्यक्रम नाही. राष्ट्रपती राजवटीसाठी राज्यपालांनी रिपोर्ट लिहायचा असतो, मी त्यावर काही बोलणार नाही. असे सुद्धा पाटील म्हणाले.

    नितेश राणेंवर सूडबुद्धीने कारवाई

    दरम्यान राज्य सरकार सूडबुद्धीने वागत आहे. काल नितेश राणेंच्या निलंबनासाठी प्रयत्न होता. 12 आमदारांचे देखील यांनी निलंबन केले होते. ही सर्व मनमानी सुरू आहे. विधान भवनाच्या घडणाऱ्या गोष्टीचा फायदा किती घ्यायचा असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला. तसेच नितेश राणेंवर अटकेचा प्रश्न मनमानी नाही तर काय म्हणावे अशी बोचरी टीका चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर केली. तसेच विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी आठ ते दहा दिवस पत्र आधी राज्यपालाकडे देण्याची गरज असते, मात्र 24 तास पत्र आधी देऊन विधानसभा अध्यक्षांची नियुक्ती कशी होणार असा सुद्धा प्रश्न चंद्रकांत दादा पाटील यांनी उपस्थित केला.